कठीण काळात मदतीला अजय देवगण सरसावला, मुंबईत अजयकडून 20 आयसीयू बेडची व्यवस्था

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत

Updated: Apr 29, 2021, 04:41 PM IST
कठीण काळात मदतीला अजय देवगण सरसावला, मुंबईत अजयकडून 20 आयसीयू बेडची व्यवस्था title=

मुंबई : कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज कोट्यवधी लोक या विषाणूच्या जाळ्यात सापडत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची संख्या दिवसेंन दिवस वाढत आहे. दररोज हजारो लोकांना या विषाणूची लागण होत आहे. मुंबईत दररोज 4000 हून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासतेय.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात पुढे केले आहेत. नुकताच बॉलिवूड अभिनेता अजय देवगणही लोकांच्या मदतीसाठी पुढे धावुन आला आहे. त्याने आपल्या मित्रांसोबत 20 आयसीयू बेडची व्यवस्था केली आहे.

अजय देवगनने आपल्या सिनेसृष्टीतील मित्रांसोबत बीएमसीला सुमारे 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. याद्वारे 20 आयसीयू बेड बनविण्यात आले आहेत. हे बेड्स मुंबईच्या शिवाजी पार्क भागात ठेवण्यात आले आहेत. वृत्तानुसार अजय देवगणच्या संस्थेच्या माध्यमातून ही रक्कम बीएमसीला देण्यात आली आहे.

या कोविड आयसीयूमध्ये पॅरा मॉनिटर, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन हिंदुजा हॉस्पिटलचे डॉक्टर सांभाळत आहेत. हे रुग्णालय शिवाजी पार्कपासून फारसं दूर नाही. हिंदुजा हॉस्पिटलचे सीओओ जॉय चक्रवर्ती यांनी सांगितल की, हे हिंदुजा हॉस्पिटलचा एक्सटेंशन असल्याचे सांगितलं जिथे सर्व व्यवस्थापनाद्वारे जेवण, मेडिकल, नर्स देण्यात येतील.

स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी याचं कंन्फर्मेशन केलं आहे की, अजय देवगणने यांना आयसीयू बेड तयार करण्यास मदत केली आहे आणि त्याच्या या कामाचं त्यांनी कौतुक केलं आहे.

क्लिनिकच्या बाहेर झाला होता स्पॉट्स
मंगळवारी अजय देवगनला मुंबईतील क्लिनिकच्या बाहेर स्पॉट केलं होतं. त्यानंतर त्याचे चाहते अस्वस्थ झाले. त्याला अजयच्या प्रकृतीची चिंता वाटू लागली. अजय गुलाबी रंगाच्या टी-शर्टसह ट्राऊजरमध्ये दिसला. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते

ओटीटीवर टाकणार पाऊल
अजय देवगन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवणार आहे. तो क्राइम ड्रामा सीरीज रुद्र- द एज ऑफ डार्कनेस मध्ये लवकरच दिसणार आहे. ही मालिका डिस्नेप्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. अजयने बर्‍याच चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका साकारली आहे, पण या सिरीजमध्ये तो  यावेळी एक प्रखर पोलिस अधिकारी म्हणून दिसणार आहे. चाहते अजय देवगणच्या या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.