मुंबई : आपल्या हसऱ्या चेहऱ्याने किशोर कुमार यांनी चित्रपटाच्या पडद्यावर नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. किशोर कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
प्रेक्षकांना किशोर कुमार खूप आवडले असले तरी चित्रपट निर्मात्यांना किशोर कुमार फारसे आवडले नाही. कारण ते एकमेव अभिनेते होते ज्यांनी पैसे घेतल्यावरच कामाला सुरुवात केली आणि जर त्यांनी योगायोगाने अर्धे पैसे दिले तर काम देखील त्याचप्रमाणे होते असं त्याचं एकंदरीत वागणं असायचं असं बोललं जातं.
ज्यांनी पैसे न देता किंवा अर्धे पैसे देऊन कामाला सुरुवात केली, तर त्यांना कामही अर्धच करुन मिळणार, म्हणजे अर्धे पैसे दिले तर अर्धा मेकअप केला जाणार...
एक किस्सा आहे जो किशोर कुमार यांच्या आयुष्यातील सर्वात मनोरंजक किस्सा असल्याचं बोललं जातं. एकदा किशोर कुमार यांनी एका निर्मात्याला धडा शिकवला होता.
खरं तर, जेव्हा निर्मात्याने किशोर कुमार यांना सर्व पैसे दिले नाहीत तेव्हा ते चेहऱ्यावर अर्धा मेकअप करून चित्रपटाच्या सेटवर पोहोचले आणि म्हणू लागला की अर्धे पैसे मिळाले तर अर्धा मेकअप करु...
किशोर कुमार यांनी सेटवर पाऊल ठेवताच दिग्दर्शकाचे डोळे पाणावले. हा किस्सा जेव्हा समोर आला तेव्हा अनेकांना हसू फुटले आणि त्यानंतर कोणत्याही निर्मात्याने किशोर कुमारशी पंगा घेण्याचा विचार ही केला नाही.