अभिनेता रवी तेजाच्या भावाचा कार अपघातात मृत्यू

शम्साबाद जवळ एका कार दुर्घटनेत तेलगू अभिनेता रवी तेजा याचा भाऊ भरत राजू यांचा मृत्यू झाला आहे. शम्साबाद येथून गचिबोवलीकडे जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. भरत यांचा जागेवरच मृत्यू झाला. ते स्वत: कार चालवत होते. ते कारमध्ये एकटेच होते. त्यांनी सिनेमामध्ये देखील काम केलं आहे.

Updated: Jun 26, 2017, 05:50 PM IST
अभिनेता रवी तेजाच्या भावाचा कार अपघातात मृत्यू title=

हैदराबाद : शम्साबाद जवळ एका कार दुर्घटनेत तेलगू अभिनेता रवी तेजा याचा भाऊ भरत राजू यांचा मृत्यू झाला आहे. शम्साबाद येथून गचिबोवलीकडे जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. भरत यांचा जागेवरच मृत्यू झाला. ते स्वत: कार चालवत होते. ते कारमध्ये एकटेच होते. त्यांनी सिनेमामध्ये देखील काम केलं आहे.

उभ्या असलेल्या एका गाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला. गाडीच्या चालकावर देखील गाडी उभी केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यपान करुन ते गाडी चालवत होते का याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.