Priyanka Chopra Hindi Film: प्रियंका चोप्रा ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. जिने लग्नानंतरही आपल्या करिअरशी तडजोड केली नाही. अलीकडेच प्रियंका चोप्राने 'सिटाडेल 2' चे शूटिंग पूर्ण केले आहे. प्रियंका चोप्राने शूटिंग संपताच तिने तिच्या चाहत्यांना एक अप्रतिम फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, प्रियंका चोप्राबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रियंका चोप्रा हॉलिवूडनंतर आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. प्रियंका चोप्राने 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात शेवटचे काम केले होते. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियंका चोप्राने फरहान अख्तरसोबत काम केले होते.
5 वर्षांनंतर प्रियंकाचा पुन्हा बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रियंका चोप्रा बॉलिवूड पासून दूर गेली. अशातच आता प्रियंका चोप्राने बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलचा खुलासा स्वत : प्रियंकाने केला आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना प्रियंका चोप्राने मोठा खुलासा केला आहे. तिने हिंदी प्रोजेक्ट संदर्भात बोलताना म्हणाली की, 'मी गंमत करत नाहीये. काही दिवसांपूर्वी अनेक चित्रपट निर्मात्यांनी माझ्याशी संपर्क साधला. मी अनेक निर्मात्यांच्या स्क्रिप्ट वाचल्या आहेत. आता मी पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचार करत आहे. 2024 हे वर्ष माझ्यासाठी खूप व्यस्त गेले. त्यामुळे 2025 मध्ये माझ्याकडे खूप काम आहे. मी तुम्हाला इतकच सांगेन की लवकरच चाहत्यांना एक चांगली बातमी मिळेल'.
2025 मध्ये प्रियंका चोप्रा चाहत्यांना देणार सरप्राईज
प्रियंका चोप्राच्या या वक्तव्याने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. प्रियांका चोप्रा 'जी ले जरा' या चित्रपटाबद्दल बोलत असल्याचा अंदाज लोकांनी लावला आहे. 2021 मध्ये 'जी ले जरा' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात प्रियंका चोप्रासह आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात तीन मुलींची रोड ट्रीप दाखवण्यात येणार आहे.