Sanya Malhotra Latest News: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे दिल्ली मेट्रोची. येथे कधी काय घडेल काही सांगता येत नाही कारण काही दिवसांपुर्वी दिल्ली मेट्रोतून(Delhi Metro) इंटरनेटवर गाजणारी अभिनेत्री उर्फी जावेद हिच्यापेक्षाही तोकडे कपडे घालून एक मुलगी प्रवास करताना दिसली होती. त्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली होती. ही आपली संस्कृती नाही, हे कसं काय सहन केलं जाऊ शकतं, असं म्हणत ट्रोलर्सनी या मुलीवर टीकाही केली होती. यावेळी मेट्रोतून प्रवास करताना या मुुलीकडे कोणाचे लक्ष नव्हते. असे समोर आलेल्या फोटोतून कळत होते. त्यानंतर या फोटोवरून तिचे मीम्सही फिरू लागले होते. त्यानंतर या मुलीची प्रेरणा घेत काही मुलांनी स्कर्ट घालत दिल्ली मेट्रोवर संचार केला होता.
आता दिल्ली पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि तेही एका अभिनेत्रीमुळे. यावेळी तिनं आपला तो अनुभव शेअर केला आहे. या अभिनेत्रीचे नावं आहे सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra). सान्या मल्होत्रा ही अभिनेत्री अनेकदा चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपुर्वी तिनं गुडगांव येथे नवं घर घेतले होते. 4BHK घर घेत ती ही गुडन्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. यावेळी तिनं गृहप्रवेशाचे फोटोही इन्टाग्रामवर शेअर केले होते. यावेळी तिनं सुंदर अशी रेशीमी साडी परिधान केली होती. तिच्या लुकचीही खूप चर्चा झाली होती.
'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिनं आपल्या आयुष्यातील एक कटू प्रसंग मांडला आहे. तिनं सांगितले की, दिल्ली मेट्रोमध्ये असताना एका इसमानं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करू पाहत होता. परंतु त्यावेळी कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. याबद्दलची खंत तिनं व्यक्त केली आहे.
हेही वाचा - '40 डिग्री सेल्सियस तापमान आणि शुटिंग...' नीना गुप्ताने सांगितला अनुभव
हौटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत तिनं याबद्दल खुलासा केला आहे, ती म्हणाली की, ''जेव्हा मी कॉलेजमधून बाहेर पडायचे तेव्हा साधारण संध्याकाळचे 7-8 वाजलेले असायचे. असं अनेकदा घडलंय की काही लोकं माझा पाठलाग करायचे. अशाच एका दिवशी मी कॉलेज सुटल्यावर मी मेट्रो पकडली. मी मेट्रोत चढले आणि तिथे चार-पाच मुलं होती. त्यावेळी त्यातील एका मुलानं माझी छेड काढायला सुरूवात केली त्यानंतर त्यानं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्शही केला. मी तेव्हा काहीच करू शकले नाही. जर मी ओरडले तर वेगळाच प्रसंग निर्माण झाला असता त्यामुळे त्याची मला भिती होती.'' असं ती म्हणाली.
ती पुढे म्हणाली की, ''लोक मला विचारतात की तू याबाबत काहीच कशी नाही बोललीस तेव्हा फक्त एवढेच वाटते की काहीतरी करून पळून जावे, तसंच मलाही वाटतं होतं. त्यावेळी मला कोणी मदत केली नाही. मी माझा बचाव केला आणि तिथून पळून गेले. तरी ती मुलं माझ्यामागे लागली. त्यांची उंची ही सहा फूट तरी होती. त्यावेळी मी जिथे उतरले तिथे गर्दी होती म्हणून मी वाचले आणि कशीबशी तिथू धूम ठोकली.''