सायली संजीवचे 'पप्पा' आहेत अशोक सराफ? अखेर समोर आलं सत्य

अभिनेत्री सायली संजीव ही त्या मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. जी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सायलीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सायलीने कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. 

Updated: Nov 24, 2023, 03:09 PM IST
सायली संजीवचे 'पप्पा' आहेत अशोक सराफ? अखेर समोर आलं सत्य title=

मुंबई : अभिनेत्री सायली संजीव ही त्या मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. जी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सायलीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सायलीने कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असाणारी सायली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी या चर्चेच कारण जरा वेगळं आहे.

काही दिवसांपुर्वी सायली अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचं बोललं जात होतं. यानंतर सायलीने आता याबद्दल एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. सायलीला या दोघांची लेक नक्की का म्हटलं जातं याबद्दल तिने सांगितलं आहे. लवकरच सायलीचा 'झिम्मा 2'या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सायली सध्या व्यस्त आहे.

नुकतीच सायलीने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,  'माझ्यासाठी बाबा म्हणजे माझे वडील संजीव आहेत. अशोक सराफ सर यांनी मला स्वतःहूनच सांगितलं की तू मग मला काय म्हणशील, मग तू मला पप्पा म्हण. ते खूप दिग्गज कलाकार आहेत. मला वाटतं 'काहे दिया परदेस' पासून ते मला बघू लागले. त्याच्या आधी आमची काही ओळख नव्हती. त्यांनी मला सिरीयलमध्ये बघितलं आणि माझं पहिलं जे प्रोमो आले तेव्हाच सगळ्यांनी ही कमेंट सुरू केली होती की ही निवेदिता सराफ यांची कॉपी आहे. ती त्यांची मुलगी आहे का? असं अनेकांनी विचारायला सुरुवात केली. माझा त्यांच्याशी काही संपर्क नव्हता. पण ते न चुकता दररोज ८. ३० ला पॅकअप करायचे आणि ९. ला टीव्ही लावून बसायचे. मालिका बघायचे.

सायली पुढे म्हणाली, 'त्यांची एक फिल्म होती त्याच्या म्युझिक लाँचला मी गेले. त्यांनी स्पेशली एका मित्रातर्फे निरोप पाठवला होता की तिला प्लिज घेऊन या. मी तिथे गेले आणि आमची पहिली भेट झाली. त्यानंतर ते मुलीचं आणि बापाचं नातं सुरू झालं. एका पॉईंटला देव कसं करतो ना माझे वडील आता गेले वर्षभरापूर्वी आणि चार वर्षांपासून मी अशोक पप्पांना ओळखते. तर त्याने ते ठरवून ठेवलं होतं की इथे एक पोकळी निर्माण होणार आहे तर आपण थोडासा एक सपोर्ट उभा करून ठेवू. त्यांचं आणि माझं नातं अमेझिंग आहे.' सायलीचं हे वक्तव्य सध्या चाहत्यांचं लक्ष्य वेधून घेत आहे.