एकमेकांच्या जीवावर उठले होते बॉलिवूडचं 'हे' दिग्गज कपल; खुद्द अभिनेत्रीच केला खुलासा

Shabana Azmi Javed Akhtar: बॉलिवूड सेलिब्रेटींच्या नात्याविषयी अनेकदा चर्चा केली जाते भाष्य केले जाते. सध्या अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्रीनं आपल्या नात्याविषयी (Bollywood Celebrities) खुलासा केला आहे. तेव्हा चला तर जाणून घेऊया काय म्हणाल्या या अभिनेत्री? 

गायत्री हसबनीस | Updated: May 30, 2023, 06:48 PM IST
एकमेकांच्या जीवावर उठले होते बॉलिवूडचं 'हे' दिग्गज कपल; खुद्द अभिनेत्रीच केला खुलासा title=
May 30, 2023 | Shabana Azmi on her Relationship with Javed Akhter आपल्या प्रत्येकाचे आपल्या पतीशी अथवा आपल्या पत्नीशी चांगले आणि वेगळे नाते असते असेच काहीसे नाते आहे ते म्हणजे शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचे. (Photo: Shabana Azmi | Instagram))

Shabana Azmi Revelation on Javed Akhtar: बॉलिवूड हे अनेक कारणांसाठी चर्चेत असते. कधी या बॉलिवूडच्या विश्वनगरीमध्ये वादग्रस्त चित्रपटांमुळे रणकंदन माजते तर कधी कुणाच्या वादग्रस्त वक्तव्यानं. परंतु बॉलिवूड म्हटलं की काहीतरी सनसनाटी ही आलीच. सध्या अशाच एका सनसनाटीची सगळीकडेच चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपल्या पहिल्या लग्नापासून वेगळं होतं दुसरं लग्न थाटलं आहे. त्यातीलच एका सेलिब्रेटीची चर्चा आहे आणि ते कपल म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi Interview) आणि लेखक जावेद अख्तर. शबाना आझमीशी जावेद अख्तर यांनी दुसरे लग्न केले आहे. परंतु ते दोघं वेगळ्याचं एका कारणांसाठी चर्चेत आले आहेत. 

यावेळी शबाना आझमी यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक फॅमिली फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये अभिनेत्री शिबानी दांडेकर, जावेद अख्तर, फरान अख्तर, झोया अख्तर आणि जावेद अख्तर यांची पहिली पत्नी हनी इरानीही यावेळी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी या फोटोखाली कॅप्शन दिले होते की, 'हम साथ साथ हैं' त्यांच्या या फोटोची बरीच चर्चा रंगली होती. परंतु शबाना आझमी यांनी एका मुलाखतीतून त्यांच्या आणि जावेद अख्तर यांच्या रिलेशनशिपवर भाष्य केले आहे. त्यांनी फिल्मफेअरला (Shabana Azmi Family Photo) दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की ते एकमेकांशी प्रचंड भांडायचे आणि एक दुसऱ्यांना मारूनही टाकण्याच्या विचारात होते. परंतु नक्की काय झालं होतं? जाणून घेऊया या लेखातून. खुद्द अभिनेत्री शबाना आझमी यांनी यावर भाष्य केले आहे. 

हेही वाचा - ना सप्तपदी, ना लग्नाचा थाट; धर्माच्या सीमा ओलांडून नसिरुद्दीन शाह - रत्ना पाठक यांनी बांधलेली लग्नगाठ

प्रत्येकाचे नाते हे वेगळे असते त्यातून त्यांच्यातील प्रेमाची परिभाषाही अत्यंत वेगळी असते. यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, ''मी काही कायमच रोमॅण्टिक नव्हते. मी आणि जावेद अनेकदा भांडायचो. आम्ही एकमेकांच्या जीवावरही उठलो होतो. आज प्रेमाच्या बाबतीत तरूणींच्या व्याख्या बदलल्या आहेत परंतु माझ्यावेळेस तरूणींच्या प्रेमाच्या व्याख्या या फारच वेगळ्या होत्या. त्यातून त्यावेळी मी परीकथा, कार्टून्स आणि पुस्तकांमधल्या प्रेमकथा वाचायचे. परंतु मी फार वेगळी होते. मी माझ्या आईवडिलांना पाहिलं आहे. त्यांच्या नात्यात खूप चांगली मैत्री होती.'' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''मीही माझ्या नात्यात त्यालाच महत्त्व दिले आहे.'' असं त्या म्हणाल्या. पुढे त्यांनी आपल्या नात्याबद्दल सांगितले की, ''कुठल्याही नात्यात दुसऱ्या व्यक्तीसाठी सन्मानाची भावना असणे अत्यंत महत्त्वाचे असते. आमच्या दोघांकडे एकाची प्रकारची विचारधारा आहे. आमची मैत्री इतकी पक्की आहे की याला लग्नही तोडू शकणार नाही''. शबाना आझमी या लवकरच करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून दिसणार आहेत.