आर्यन खान पाठोपाठ अजय देवगणची लेक दिसली 'या' अवस्थेत, पाहून बसणार नाही विश्वास

शाहरुख खानच्या लेकानंतर अजय देवगणची लेक चर्चेत, व्हायरल फोटोमुळे एकच खळबळ

Updated: Jul 20, 2022, 04:32 PM IST
आर्यन खान पाठोपाठ अजय देवगणची लेक दिसली 'या' अवस्थेत, पाहून बसणार नाही विश्वास title=

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लाडकी लेक न्यासा देवगणनं अजून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली नाही, तरी ती लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक आहे. न्यासा नेहमीच चर्चेत असल्याचे दिसते. न्यासाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. बऱ्याचवेळा न्यासा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा न्यासा पार्टीत परिधान केलेल्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. 

न्यासा गेल्या काही दिवसांपासून तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत युरोप टूरवर आहे. आता न्यासा ग्रीसला पोहोचली आहे. तिथल्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. न्यासाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

न्यासा स्वित्झर्लंड मध्ये असलेल्या Glion Institute of Higher Education मध्ये शिकत आहे. अजय देवगण आणि काजोलचं लग्न १९९९ साली झालं, तर २००३ मध्ये न्यासाचा जन्म झाला. न्यासा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जाते.