Aishwarya Rai Bachchan police custody : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, माजी मिस इंडिया आणि बच्चन कुटुंबातील सुनबाई, कमालीचं सौंदर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai bachchan)...ऐश्वर्याने आपल्या आरस्पानी सौंदर्याने सर्व जगाला वेड लावलं आहे. ऐश्वर्या बच्चन ,मुलगी आराध्याच्या जन्मानंतर बॉलिवूडपासून लांब गेली. आपला संपूर्ण वेळ मुलीच्या संगोपनासाठी देण्याचं तिने ठरवलं होतं. मुलगी आराध्या बऱ्यापैकी मोठी झाल्यावर ऐश्वर्याने कमबॅक केलं खरं ,पण तिचे चित्रपट जादू करू शकले नाहीत. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर ऐश्वर्या रणबीर कपूरसोबत 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात दिसली होती त्यात तिच्या लूकची प्रचंड चर्चा झाली होती.
मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐश्वर्या (aishwarya rai bachchan ed summoned) आजही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. तिच्या ऑफिशियल अकॉउंटवर ऐश्वर्या तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून लाईक्स आणि कॉमेंट्स येतात. तसेच बरीच बॉलीवूड इव्हेंट्समध्ये ऐश्वर्या आपल्याला दिसते. (Aishwarya rai bachchan summoned by ed department know the truth )
सौंदर्यवती ऐश्वर्या बच्चन आजही फार चर्चेत असते. आता बॉलिवूड कलाकार म्हटलं की, अफवा, चर्चा, कॉंट्रोव्हर्सी होतातच. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याच्या बाबतीत एक अशी बातमी समोर आली होती की ज्यामुळे बच्चन कुटुंब चांगलंच चर्चेत आलं होतं. आणि ती बातमी होती ' ऐश्वर्या राय बच्चनला पोलिसांकडून अटक' या एका बातमीमुळे बच्चन कुटुंबियाला मनस्ताप सहन करायला लागला होता.
पनामा पेपर लीक प्रकरणी ईडी कार्यालयाने ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावला होता. चौकशीसाठी दिल्लीत बोलवलं होतं. ऐश्वर्याबद्दल अशी बातमी आली होती, ती बेकायदेशीर परदेशी कंपनीची डायरेक्टर आणि शेअरहोल्डर होती. तर तिचे वडील, आई आणि भाऊ कंपनीत तिचे भागीदार होते. या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती.यासाठी तिची चौकशी झाली होती. आणि त्याचा फटका बच्चन कुटुंबियांच्या नावाला बसला होता.
#WATCH Delhi | Aishwarya Rai Bachchan leaves from Enforcement Directorate office. She was summoned by ED in connection with the Panama Papers case. pic.twitter.com/zqxJlR7iPT
— ANI (@ANI) December 20, 2021
पनामा पेपर्स लीकमध्ये केवळ ऐश्वर्याच (bachchan family in panama papers leak) नाही तर बिग बी अमिताभ बच्चन यांचं नावसुद्धा समोर आलं होतं . पनामा पेपर्स लीक प्रकरणात मोसॅक फोन्सेका (mosac fonseca panama papers leak) या कंपनीची काही कायदेशीर कागदपत्रे लीक झाली होती आणि त्यातून बऱ्याच मोठ्या व्यक्तींची नावं समोर आली होती. कलाकारांसोबत देशातील मोठमोठे उद्योगपती, राजकारण्यांच्या नावाचा समावेश होता. (Aishwarya rai bachchan summoned by ed department know the truth )