Akshay Kumar नं सर्वांसमोर उघडलं Twinkle चं गुपित; म्हणाला, "लग्नाच्या पहिल्याच रात्री हे सत्य कळलं"

शेड्युल कितीही व्यस्त असलं तरी, अभिनेता आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला विसरत नाही.

Updated: Jan 15, 2022, 07:36 PM IST
Akshay Kumar नं सर्वांसमोर उघडलं Twinkle चं गुपित; म्हणाला, "लग्नाच्या पहिल्याच रात्री हे सत्य कळलं" title=

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत स्टार्सच्या खासगी आयुष्याबाबत आपल्यापैकी सर्वांनाच जाणून घ्यायला आवडते. कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री कोणाला डेट करतेय, कोणाचं ब्रेकअप झालंय हे सगळं देखील आपल्याला जाणून घ्यायला आवडतं. बॉलिवूड मधील अनेक अभिनेता किंवा अभिनेत्रींनी आपल्या सहकलाकारांसोबतच लग्न केलं आहे. परंतु यांचं प्रेम कसं जुळलं याबद्दल माहिती नसते. त्यात अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचीही १ जोडी आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. लग्नाला 20 वर्षे झाली तरी दोघेही एकत्र आहेत.

शेड्युल कितीही व्यस्त असलं तरी, अभिनेता आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला विसरत नाही.

अक्षय कुमारच्या आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते आणि तो परदेशात एका चित्रपटासाठी शूटिंग करत असताना त्याला त्याच्या आईची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली. कसेतरी चित्रपटाचे शूटिंग सोडून तो भारतात आला. मात्र, अक्षय कुमारच्या आईला डॉक्टर वाचवू शकले नाहीत.

अक्षय कुमार त्याच्या कामाला खूप महत्त्व देतो, त्याच्या आईच्या मृत्यूनंतर केवळ 2 दिवसांनी अक्षय त्याच्या कुटुंबासह चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघून गेला. सध्या अक्षय कुमार आपल्या कुटुंबासोबत परदेशात वेळ घालवत आहे. सध्या अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये आला होता. शोमध्ये अर्चना पूरण सिंहने अक्षय कुमारला त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही मजेदार प्रश्न विचारले. अर्चना पुराण यांनी त्याला विचारले होते की, तू किंग साइज आयुष्य जगतोस का?

यावर उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला नाही. यानंतर अर्चनाने त्याला विचारले की, जेव्हा तुमच्या दोघांमध्ये भांडण होते तेव्हा दोघांमध्ये कोण जिंकतो. या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय कुमारने हळूच ट्विंकलकडे बोट दाखवले. त्याचवेळी अक्षय कुमारने सांगितले की, 'मला लग्नाच्या पहिल्या रात्रीच हे कळले होते की, मी ट्विंकलसोबत कधीही भांडणात जिंकू शकणार नाही.'