आम्ही एकत्र राहत होतो आणि...; Disha Patani सोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर अॅलेक्झॅन्डरचं वक्तव्य

अॅलेक्झॅन्डरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Dec 11, 2022, 03:09 PM IST
आम्ही एकत्र राहत होतो आणि...; Disha Patani सोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर अॅलेक्झॅन्डरचं वक्तव्य title=

Aleksandar Alex on Rumord On Disha Patani Relationship : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दिशा चाहत्यांच्या संपर्कात राहते. दिशा गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. त्यानंतर आता दिशा तिचा मित्र अॅलेक्झॅन्डर अॅलेक्ससोबत (Aleksandar Alex) दिसली. त्या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, या सगळ्या चर्चांवर आता अॅलेक्झॅन्डरनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय त्या दोघांची भेट कशी झाली हे देखील सांगितलं आहे. 

पाहा काय म्हणाला अॅलेक्झॅन्डर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान अॅलेक्झॅन्डरनं सांगितलं की, 'लोक आमच्याबद्दल सखोल जाणून घेण्याचा आणि त्यावर त्यांना वाटेल ते अंदाज लावण्यात येत आहेत. अॅलेक्झॅन्डर म्हणाला, हे सगळं कसं चाललंय हे मी काही दिवसांपासून पाहत होतो. आम्हाला सत्य माहित आहे. मला समजत नाही की लोकांना हे सर्व करण्याची गरज का आहे? ते इतर लोकांना त्यांचे जीवन शांततेत का जगू देऊ शकत नाहीत? आम्ही यावर हसतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तो पुढे म्हणाला की, 'तो दिशाला त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भेटला होता. ते दोघे फ्लॅटमेट होते.' अॅलेक्झॅन्डर या विषयी बोलताना म्हणाला, 'आम्ही 2015 मध्ये एकत्र राहत होतो. त्यावेळी दिशा आणि मी एकाच एजन्सीमध्ये होतो. दोघेही फिटनेसबाबत खूप पॅशनेट आहेत, त्यानंतर आम्ही एकत्र जिममध्ये जायला लागलो, त्यामुळे आमचं बाँडिंग खूप चांगले झालं.'

हेही वाचा : 'आमचं कोकणही...', समृद्धी महामार्गावरून अभिनेता Abhijeet Kelkar चा राज्यकर्त्यांना टोला

अॅलेक्झॅन्डरनं सांगितले की, दिशा ही त्याच्या कुटुंबासारखी आहे आणि जेव्हा जेव्हा दोघांनाही लो फील होते तेव्हा ते एकमेकांसोबत वेळ घालवतात. त्याने असेही सांगितले की तो टायगर श्रॉफच्या खूप जवळचा आहे आणि दिशाच्या ब्रेकअपबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'मी इतर कोणत्याही गोष्टीवर भाष्य करणार नाही.' टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानी अनेकदा अॅलेक्झॅन्डरसोबत दिसली आहे. तेव्हापासून त्यांच्या रिलेशनच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, अॅलेक्झॅन्डर हा गेल्या सात वर्षांपासून भारतात आहे. 

अलेक्झांडर अॅलेक्स हा दिशा पटानीचा जिम ट्रेनर (Disha Patani Gym Trainer) आहे. 'गिरगिट' या वेबसीरिजमधून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याला हिंदी येत नव्हती तर त्यानं या वेबसीरिजसाठी ती भाषाही शिकली. दिशा नेहमीच अॅलेक्झॅन्डरसोबत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.