बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटांच्या अफवांदरम्यान अमिताभ बच्चन यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी सोमवारी आणि मंगळवारी शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे. तसंच काहींनी याचा संबंध ऐश्वर्या-अभिषेकसंबंधी सुरु असलेल्या चर्चांशी लावला आहे.
सोमवारी अमिताभ यांनी एका शब्दाची पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "T 5210 - चुप (quiet)! )." याच्या पुढे त्यांनी रागावलेला इमोजीही लावला आहे. यानंतर त्यांनी आज एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "T 5211 चुप चाप, चिडी का बाप". यावेळी त्यांनी तोंडाला चेन लावल्याचा इमोजी शेअर केला आहे.
T 5210 - चुप
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 1, 2024
"तुमची पोस्ट निराशेची किंवा निराशेची खोल भावना दर्शवते. कोणीतरी काहीतरी चुकीचे केलं असावं असं यातून सूचित होत आहे. काहीवेळा, शांतता शब्दांपेक्षा अधिक मजबूत संदेश देते. आशा आहे की सर्वकाही सकारात्मकतेने निराकरण होईल," असं एका युजरने लिहिलं आहे. "आशा आहे सर्व ठीक आहे. काळजी घ्या," अशी अपेक्षा एका चाहत्याने व्यक्त केली आहे.
T 5211 - चुप चाप, चिड़ी का बाप
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 2, 2024
"सर तुम्हाला काय झालं आहे? सगळं काही ठीक आहे ना?," असं एकाने म्हटलं आहे. तर एकाने आता हे काय सरजी? अशी विचारणा केली आहे. एक युजर म्हणाला, "शांत राहणं, यामध्ये दुसरा आनंद नाही".
ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबातील मतभेदाच्या अफवा जुलै 2024 मध्ये अनंत अंबानीच्या लग्नाच्या वेळी सुरू झाल्या. ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या बच्चन कुटुंबासह न येता स्वतंत्रपणे कार्यक्रमस्थळी आल्यापासून याची सुरुवात झाली. अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, मुलगी श्वेता, नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नवेली यांच्यासह बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांनी एकत्र हजेरी लावली.
या महिन्याच्या सुरुवातीला अभिषेक किंवा त्याच्या कुटुंबीयांनी ऐश्वर्याला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने अफवांना ऊत आला. ऐश्वर्या आणि अभिषेक 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांना एक मुलगी आहे, जिचा जन्म 16 नोव्हेंबर 2011 रोजी झाला.