दगडासारखा चेहरा म्हणत 'या' अभिनेत्याला केलं होतं रिजेक्ट, हॉलिवूडमध्ये मिळाला मोठा ब्रेक ...

बॉलिवूडमध्ये संधी मिळावी म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात असं नाही अनेकांना कधीच संधी मिळत नाही तर काहींना खूप उशिरा संधी मिळते. बऱ्याचवेळा कधीकाळी रिजेक्ट झालेले लोक हे पुन्हा एकदा कसं अभिनय क्षेत्रात यश मिळवतात ते आश्चर्यचकीत करणारं आहे. असाच एक अभिनेता आहे त्याच्याविषयी आज आपण जाणून घेऊया.

दिक्षा पाटील | Updated: Jul 5, 2023, 02:38 PM IST
दगडासारखा चेहरा म्हणत 'या' अभिनेत्याला केलं होतं रिजेक्ट, हॉलिवूडमध्ये मिळाला मोठा ब्रेक ... title=
(Photo Credit : Film History Pics Instagram)

Amrish Puri : अभिनेता होण्यासाठी काही विशिष्ठ गोष्टी असणं महत्त्वाचे असते असे म्हणतात. त्यात अभिनेत्याचा लूक आणि त्याचा आवाज असेल तर कलाकार हे नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतात. तर त्यासोबतच खलनायकात काही ठरावीक गोष्टी असायला हव्यात असं म्हणतात. पण कोणत्याही कलाकाराला कधीच खलनायकाच्या भूमिकेत असावे असे वाटतं नाही. अनेक असे खलनायक आहेत ज्यांना हीरो होण्याची इच्छा असते पण त्यांना ती संधी मिळत नाही. असाच एक अभिनेता होता ज्याला हीरो बनायचे होते पण त्याला ती संधी कधीच मिळाली नाही. तर त्यानं खलनायकाची इतकी उत्तम भूमिका साकारली की त्याला पाहून सगळ्यांना वाटलं की हा अशाच भूमिकांसाठी योग्य आहे. तुम्ही ओळखलं हा कोण आहे? या अभिनेत्याला बॉलिवूडनं आधी रिजेक्ट केलं होतं. त्यानं असं काम केलं की त्यानं नंतर हॉलिवूडमध्ये काम केलं. 

हा अभिनेता कोण? असा प्रश्न तुम्हाला अजून पडला असेलच... हा अभिनेता म्हणजे दिग्गज अभिनेते अमरीश पुरी आहेत. अमरीश पुरी यांना कधीच हीरोची भूमिका मिळाली नाही. त्यांनी खलनायकाची भुमिका साकारली, पण त्यांनी त्यानंतर केलेल्या काही पॉझिटिव्ह भूमिकेनं सगळ्यांना त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेची विसरल पडली. अमरीश पुरी यांच्या त्रिदेव, राम लखन सारख्या चित्रपटांमधील खलनायकाच्या भूमिकेनं त्यांची तिच ओळख निर्माण झाली होती. तेव्हा सगळ्यांना वाटले की त्यांच्यासारखी खलनायकाची भूमिका कोणीच साकारू शकत नाही. याशिवाय त्यांची दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि परदेस या चित्रपटातील भूमिकांविषयी काय बोलायचे असं अनेक म्हणतात त्याचे कारण त्यांचा उत्तम अभिनय होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : आजारपणामुळं Samantha Ruth Prabhu चा चित्रपटसृष्टीतून ब्रेक, तिला झालंय तरी काय?

अमरीश पुरी हे पंजाबहून मुंबईत हीरो होण्याच्या आशेनं आले होते. पण त्यांचा चेहरा पाहून दिग्दर्शकानं त्यांना स्टोन फेस असल्यामुळे हीरो होऊ शकत नाही असं म्हणतं त्यांना रिजेक्ट केलं. त्यानंतर अमरीश पुरी यांना राज्य कर्मचारी विमा महामंडळात नोकरी मिळाली. पण अमरीश पुरी यांचं करिअर हे दुसऱ्याच क्षेत्रात होतं. त्यासाठी त्यांनी सगळं सोडलं आणि थिएटरमध्ये काम करू लागले. इथे ते असा अभिनय करू लागले की त्यांना बॉलिवूड नकार देऊ शकला नाही. तर वयाच्या 38 व्या वर्षी अमरीश पुरी यांना पहिला ब्रेक मिळाला. तर त्यांना चित्रपटात फक्त ब्रेक मिळाला नाही तर त्यांच्या खलनायकाच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर अमरीश पुरी हे खलनायक म्हणून ओळखू लागले. मग काय अमरीश पुरी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही