एवढ्या लवकर कसं काय? अनन्यानं घेतलेलं नवं घर पाहून फराह खानला वाटलं आश्चर्य

Ananya Panday Buys New Home : अनन्या पांडेनं इतक्या लवकर घेतलं घर. ही बातमी कळताच फराह खानला झाले आश्चर्य.

दिक्षा पाटील | Updated: Nov 11, 2023, 10:29 AM IST
एवढ्या लवकर कसं काय? अनन्यानं घेतलेलं नवं घर पाहून फराह खानला वाटलं आश्चर्य title=
(Photo Credit : Ananya Pandey Instagram)

Ananya Panday Buys New Home : काल शुक्रवार धनतेरस इतक्या शुभ मुहूर्तावर अनेकांनी त्या निमित्तानं सोन्याच्या वस्तू केल्या काही लोकांनी त्या दिवशी गृहप्रवेश केलं. त्यात फक्त सर्वसामान्य लोक नाही तर बॉलिवूड कलाकार देखील आहेत. बॉलिवूड कलाकारांनी देखील त्या निमित्तानं त्यांच्या घरी पूजा केली. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं देखील तिच्या घराच्या पूजेची एक झलक दाखवली आहे. अनन्याचं हे जूनं घर नाही तर हे तिनं स्वत: घेतलेलं तिचं पहिलं घर आहे. त्याचा एक व्हिडीओ देखील अनन्यानं शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनन्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. 

काल अनन्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. फोटोत अनन्या तिच्या घरी झालेल्या पूजेची एक झलक दाखवताना दिसते. तर दुसरा तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अनन्या तिच्या घराच्या दरवाज्यासमोर नारळ फोडताना दिसते. अनन्याचं हे वडिलांचं घर नाही तर तिनं स्वत: घेतलेलं पहिलं घर आहे. हा फोटो शेअर करत अनन्यानं लिहिलं की माझं स्वत: चं घर! नव्या सुरुवातीसाठी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. धनतेरसच्या शुभेच्छा! 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सेलिब्रिटींनी दिल्या खास शुभेच्छा

अनन्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सेलिब्रिटी देखील मागे राहिलेले नाहीत. अनन्याची खूप चांगली आणि जवळची मैत्रिण शनाया कपूरनं त्यावर कमेंट करत लाल रंगाचं इमोजी शेअर केलं आहे. तर टायगर श्रॉफनं 'वाह, अनन्या खूप खूप शुभेच्छा!' तर फराह खान म्हणाली, 'व्वा! हे खूप लवकर झालं अनन्या. आता हे घर तुला खूप आनंद आणि यश देओ.' अनन्याची आई भावना पांडेनं कमेंट करत 'मला तुझ्यावर अभिमान आहे' असं म्हटलं आहे. 

हेही वाचा : राज ठाकरेंकडून अमृता खानविलकरला दिवाळीची खास भेट, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं मानले आभार

दरम्यान, अनन्या नुकतीच सारा अली खानसोबत करण जोहरच्या 'कॉफी विद करण 8' मध्ये दिसली होती. दोघांनी यावेळी या काऊचवर खूप गप्पा मारल्या आणि त्या दोघी आदित्य रॉय कपूर आणि शुभमन गिल यांच्याविषयी बोलताना दिसल्या. अनन्या सगळ्यात शेवटी आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसली होती. हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. अनन्या लवकरच 'कॉल मी बे' आणि 'खो गए हम कहां' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.