लग्नापूर्वी अंकिता - विकीच्या नात्याबद्दल मोठी गोष्टसमोर, व्हिडीओ व्हायरल

अंकिता - विकी लवकरचं अडकणार विवाह बंधनात, पण त्याआधी...  

Updated: Dec 12, 2021, 09:23 AM IST
लग्नापूर्वी अंकिता - विकीच्या नात्याबद्दल मोठी गोष्टसमोर, व्हिडीओ व्हायरल  title=

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहात आहेत. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफनंतर आता अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत सप्तपदी घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगाली होती. अंकिताच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरूवात झाली आहे. शिवाय तिने लग्नासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखली आमंत्रित केलं आहे. 

राज्यपालांना आमंत्रण देण्यासाठी खुद्द अंकिता त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या पतीसोबत पोहोचली होती. आता विकी आणि अंकिताच्या नात्याबद्दल आणखी एक गोष्ट तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम दिसून येत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

लग्नापूर्वी या जोडप्याने एक रोमाँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. दुबईमध्ये रोमाँटिक व्हिडीओ शूट करण्यात आल्याचे दिसत आहे. यामध्ये अंकिता आणि विकी जैन वाळवंटातील डोंगरावर फिरताना दिसत आहेत.

सध्या दोघांच्या प्रेमाचे क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहते आणि मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचे विधी गेल्या आठवड्यात सुरू झाले आहेत.

 गेल्या महिन्याच्या अखेरीस, अंकिता लोखंडेने तिच्या इंडस्ट्रीतील सर्व मित्रांना पार्टी दिली. ज्यामध्ये सृष्टी रोडे, अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर, रश्मी देसाई यांच्यासह अंकिताच्या अनेक मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या.