जेव्हा अनुष्का शर्माने उचलली क्रिकेटची बॅट, रंगला विराट अनुष्कामध्ये अटीतटीचा सामना

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा क्रीजवर उतरतो तेव्हा चांगल्या-चागंल्या गोलंदाजांना घाम फुटतो. 

Updated: Jul 2, 2021, 08:06 PM IST
जेव्हा अनुष्का शर्माने उचलली क्रिकेटची बॅट, रंगला विराट अनुष्कामध्ये अटीतटीचा सामना  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा क्रीजवर उतरतो तेव्हा चांगल्या-चागंल्या गोलंदाजांना घाम फुटतो. पण जर विराट कोहलीची कॉम्पिटिशन पत्नी अनुष्का शर्माबरोबर असेल तर काय होईल?  विराट कोहली अलीकडेच पत्नी अनुष्का शर्माबरोबर कॉम्पिटिशन करताना दिसला. मात्र ही स्पर्धा थोडी वेगळी होती.

विराट VS अनुष्का शर्मा
या दोघांमधील या सामन्याचा व्हिडिओ अनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या स्पर्धेत दोन्ही सेलिब्रेटी आपल्या एका बोटावर बॅटचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अनुष्का शर्मा या स्पर्धेत विराट कोहलीवर भारी पडताना दिसत आहे. कारण ती विराटपेक्षा चांगला बॅलन्स करताना दिसत आहे.

अनुष्काची विराटला टक्कर
व्हिडिओच्या शेवटपर्य़ंत, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांची बॅट खाली पडत नाही. या दोघांमध्ये कडक स्पर्धा रंगली. बॅटला समतोल ठेवताना अनुष्का शर्मा म्हणते की, ''बेटा विराट. मैं बैलेंस कर रही हूं एक दम टकाटक''. अनुष्काने हे चॅलेंज तिच्या चाहत्यांना देखील दिलं आहे आणि करायला सांगितलं आहे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यात जोरदार सामना रंगला पण हे चॅलेंज अनुष्काने व्यव्स्तित पार पाडलं असं म्हणावं लागेल. दोघांच्या या व्हिडिओचा चाहत्यांनी खूप आनंद लुटला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.