Dharmaveer2 Cinema : काही दिवसांपूर्वीच 'धर्मवीर' सिनेमाचं पोस्टर आणि लॉन्च टीझर रिलीज करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सचिन पिळगावर , महेश कोठारे , निर्माते मंगेश देसाई आणि बॉबी देवल हे दिग्गज कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. या सिनेमाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. अॅक्शन आणि थ्रीलचा अनुभव देणाऱ्या सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.याचं सगळयात महत्त्वाचं कारण म्हणजे आनंद दिघे यांच्या आयुष्यातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला होता. त्यामुळे आता दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.
सध्या 'धर्मवीर'चा दुसरा भाग मनोरंजन आणि राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय ठरत असातानाच, सिनेमाच्या दुसऱ्या भागात श्रीकांत शिंदेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. धर्मवीरच्या दुसऱ्या भागात कोणकोणते नवीन कलाकार दिसणार ,या बाबत प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती.अशातच आता प्रसाद ओक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दुसऱ्या भागात कोणकोणते कलाकार असणार आहेत हे सांगितलं आहे.
या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते श्रीकांत शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या आरोह वेलणकरने. आरोहने श्रीकांत शिंदेसोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. रिल आणि रियल श्रीकांत शिंदे एकाच फोटोत आहेत. असं आरोहने कॅप्शन दिलं आहे. मला या सिनेमाचा भाग होता आलं, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. असं आरोहने सांगितलं. त्यामुळे आता कधी 9 ऑगस्ट येतोय आणि सिनेमा रिलीज होतोय अशी उत्सुकता आरोहच्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे.
आरोहसाठी ही भूमिका विशेष असाणार आहे. याआधी आरोहने बऱ्याच नाटकात काम केलं मात्र त्याला ओळख मिळाली ती 'रेगे' सिनेमामुळे. त्यानंतर आरोह 'बिस बॉस'मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'रेगे' नंतर आता एका नव्या धाटणीच्या भूमिकेत आरोह चाहत्यांच्या भेटीस येत आहे. सिनेमाचा हा दुसरा भाग मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्सने दुसऱ्या भागाची निर्मिती केली. सिनेमाचा पहिला भाग रिलीज झाला त्याचवेळी त्याचा दुसरा भाग येणार असल्याचं सांगीतलं होतं. पहिल्या भागात दिघेंच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकण्यात आला होता. आाता सिनेमाचा दुसरा भाग काय कोणतं वळण घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.