आर्यन खान सह इतर 7 जणांची जे जे रुग्णालयात टेस्ट

बॉलिवूड इंडस्ट्रीला गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्स प्रकरणाच्या समस्यांना सामोरं जाव लागत आहे. 

Updated: Oct 4, 2021, 01:40 PM IST
आर्यन खान सह इतर 7 जणांची जे जे रुग्णालयात टेस्ट title=

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीला गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्स प्रकरणाच्या समस्यांना सामोरं जाव लागत आहे. याआधी ही ड्रग्स कनेक्शनमुळे अनेक बॉलिवूड कलाकारांची चौकशी झाली. आता बॉलिवूडशी संबंधित नव्या ड्रग्स प्रकरणाचा खुलासा झाला आहे. एनसीबीने अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला आर्यन खानला अटक केलं. 

आता रेव पार्टीत सामील असलेल्या 8 जणांची पुढील चौकशी केली जातेय. आर्यन सह इतर 7 जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची रुग्णालयात तपासणी केली जातेयं. ड्रग पार्टीतील सर्व 8 आरोपीना जे जे रुग्णालयात टेस्टसाठी नेण्यात आलं आहे.

आर्यनच्या मते, तो फक्त पाहुणा म्हणून पार्टीला गेला होता. आर्यन खान व्यतिरिक्त, आणखी 7 लोक एनसीबीच्या छाप्यात सामील होते. नुपूर सारिका, इश्मीत सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा आणि अरबाज मर्चंट अशी त्यांची नावे आहेत. शोधादरम्यान या लोकांकडून एमडीएमए, कोकेन, एमडी आणि चरस जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.