मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सध्या खूप नाजूक आहे. दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अटलजींना भेटायला नेतेमंडळी आणि सर्मथकांची झुंबड उडाली आहे. अटल बिहारी वाजयपेयींचे जीवन निर्विवाद होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा व्यक्तिगत आरोप लागला नाही. राजकारणाबरोबरच त्यांना साहित्य, कविता आणि सिनेमांचीही आवड होती. आता संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे.
सिनेमा पाहण्याची त्यांना प्रचंड आवड होती. ते हेमा मालिनीचे खूप मोठे चाहते होते. अटलजींनी हेमा मालिनीचा १९७२ मध्ये आलेला 'सीता और गीता' सिनेमा तब्बल २५ वेळा पाहिला होता. या गोष्टीचा खुलासा खुद्द हेमा मालिनीने केला होता. त्याचबरोबर 'तीसरी कसम' सिनेमाशीही त्यांचे खास नाते होते.
१९६६ मध्ये आलेला 'तिसरी कसम' हा सिनेमा प्रसिद्ध साहित्यकार फणीश्वर नाथ रेणूच्या चर्चित कथेवर आधारीत होता. ही अद्भभूत प्रेमकथा राज कपूर आणि वहीदा रहमान यांनी रुपेरी पडद्यावर साकारली होती. हा सिनेमा म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड होता. बासु भट्टाचार्य यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते तर सुप्रसिद्ध गीतकार शैलेंद्र या सिनेमाचे निर्माते होते. अभियन आणि दिग्दर्शनात या सिनेमाला कोणतीही तोड नव्हती. या सिनेमाला १९६७ चा राष्ट्रीय फिल्म पुरस्कारात सर्वोकृष्ट हिंदी फिचर सिनेमाचा पुरस्कारही मिळाला. संपूर्णपणे साधेपणाने नटलेला हा सिनेमा अटलजींना खूप भावला. त्यामुळे हा त्यांचा आवडता सिनेमा ठरला.
याशिवाय अटलजींना देवदास आणि बंदिनी सिनेमा खूप पसंत आहे. याशिवाय अमिताभ आणि राखीवर चित्रित केलेले 'कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है...' हे गाणे त्यांना अतिशय जवळचे वाटते. १९७६ मध्ये आलेल्या कभी कभी सिनेमातील हे गीत आहे.