आयुष्मानला साकारायचाय Money Heist मधला प्रोफेसर

Netflix वरील Money Heist या वेबसिरीजची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. 

Updated: Apr 15, 2020, 09:22 PM IST
आयुष्मानला साकारायचाय Money Heist मधला प्रोफेसर title=

मुंबई: सध्या लॉकडाऊनच्या काळात वेळ घालवण्यासाठी अनेक भारतीयांनी आपला मोर्चा Netflix आणि Amazon Prime यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दररोज वेबसिरीजबद्दल खमंग चर्चा रंगताना दिसत आहेत. या सगळ्यात  Netflix वरील Money Heist या वेबसिरीजची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. ही वेबसिरीज आणि त्यामधील पात्रे प्रेक्षकांना खूपच भावली आहेत. त्यामुळे समजा भारतात या वेबसिरीजचा रिमेक करायचा झाला तर कोणत्या कलाकारांना त्यामध्ये स्थान मिळेल, इथपर्यंत नेटकऱ्यांनी या विषयाचा किस पाडला आहे. 

सुमीत राघवन आणि ऋता दुर्गुळे 'स्ट्राबेरी शेक' शॉर्टफिल्मच्या माध्यमातून भेटीला

या सगळ्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आयुष्मान खुराना पिआनोवर Money Heist मधील Bella ciao या गाण्याची धून वाजवताना दिसत आहे. या व्हीडिओसोबत आयुष्मानने एक कॅप्शनही लिहली आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, मला Money Heist मधील प्रोफेसरची भूमिका साकारायची आहे. त्यामुळे मी प्रोफेसरप्रमाणे चष्मा घालून Bella ciao ची धून वाजवत आहे. दिग्दर्शकांनी हा व्हीडिओ पाहावा. मला अशाप्रकारचे काम करायचे आहे, असे आयुष्मानने म्हटले आहे. त्यामुळे आता आगामी काळात आयुष्मानची ही इच्छा पूर्ण होणार का, हे पाहावे लागेल. 

लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीला इतका मोठा फटका