मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान भारताप्रमाणेच जगभरात लोकप्रिय आहे.
नुकताच त्याचा 'बजरंगी भाईजान' चीनमध्ये रिलीज झाला आहे. भारताप्रमाणेच चीनमध्येही या चित्रपटाने कोटींची कमाई केली आहे.
भारताप्रमाणे चीनमध्येही या चित्रपटाने 100 कोटींचा पल्ला अल्पावधीतच पार केला आहे. सध्या या चित्रपटाचे कलेक्शन 150 कोटींच्या पार गेले आहे. सलमान खानप्रमाणेच या चित्रपटात हर्षाली मल्होत्रा या चिमुकलीने सार्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुन्नी हे पात्र चित्रपटात काहीही वाक्य न बोलताही प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. मुन्नी ही मूळची पाकिस्तानी असते. एका घटनेमुळे ती भारतामध्येच राहते. बजरंगी (सलमान खान ) त्याच्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून त्या चिमुकलीला तिच्या घरापर्यंत सुखरूप कसा पोहचवतो ? याचा हा प्रवास आहे.
हर्षाली आणि सलमान खान सोबतच या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीने खास भूमिका साकारली आहे. आजपर्यंत या चित्रपटाने 169.42 कोटींची कमाई चीनच्या बॉक्स ऑफिसवर केली आहे.
#BajrangiBhaijaan is SUPER-STRONG in China [despite #BlackPanther wave]... Collected $ 8.57 mn in *Weekend 1*, collected $ 7.98 mn in *Weekend 2* - FANTASTIC TRENDING...
[Week 2]
Fri $ 1.75 mn
Sat $ 3.35 mn
Sun $ 2.88 mn
Total: $ 26.07 million [ 169.42 cr]— taran adarsh (@taran_adarsh) March 12, 2018
भारतामध्ये सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ने 320.34 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते.
'बजरंगी भाईजान' पूर्वी आमीर खानचा 'दंगल'ही चीनी बॉक्सऑफिसवर आला होता.