'बालिका वधू' मालिकेतील नवीन आनंदीला तुम्ही पाहिलंत का? पहा क्यूट आनंदीची झलक

लोकप्रिय शो 'बालिका वधू'चा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे

Updated: Jun 28, 2021, 10:34 PM IST
'बालिका वधू' मालिकेतील नवीन आनंदीला तुम्ही पाहिलंत का? पहा क्यूट आनंदीची झलक title=

मुंबई : लोकप्रिय शो 'बालिका वधू'चा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे. शोमध्ये सगळी नवीन पात्रं आपल्याला दिसणार आहेत, यात नवीन कलाकार भूमिका साकारणार आहेत. शोच्या मेकर्सनी सोशल मीडिया हँडल्सवर शोचे टीझरही शेअर केले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक गोंडस मुलगी दिसत आहे. जी तिच्या बालपणीच्या दिवसांचा आनंद घेत आहे. जसा व्हिडिओ पुढे जातो तेव्हा मुलीच्या लग्नाची चर्चा सुरू होते.

'आनंदी' परत येतेय
विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये 'आनंदी' परत येत असल्याचं सांगितलं आहे. अशा परिस्थितीत अविका गोर थोरल्या 'आनंदी'ची भूमिका साकारणार की नाही अशी अटकळ बांधली जात आहे. 'बालिका वधू'च्या पहिल्या सीझनमध्ये अविका गौरने मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या या पात्राचं नावही 'आनंदी' होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

निर्मात्यांनी घोषणा केली
व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच शोच्या निर्मात्यांनी लिहिलं आहे की, 'बाल विवाह ही एक वाईट प्रथा आहे, जी अजूनही समाजात जिवंत आहे. या निर्मूलनासाठी, नवीन आनंदीचा जन्म झाला आहे, म्हणजेच नवीन बालिका वधूचा जन्म झाला आहे. बालिका वधू सीझन 2 लवकरच येणार आहे ... 'एका वृत्तानुसार बाल कलाकार श्रेया पटेल एका लहान वधूची भूमिका साकारणार आहे. श्रेया पटेल यापूर्वी 'आपके नजरों ने समझा'मध्ये दिसली आहे. याचबरोबर अभिनेता वंश सयानी हा 'बाल वीर' नवऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हे कलाकार झाले लोकप्रिय 
राजस्थानमधील 'बालिका वधू' शोचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे, आता पुढील शूटिंग मुंबईत होणार आहे. जुन्या शोमधील सगळे कलाकार लोकांना चांगलेच आवडतात. दादी सा ​​पासून आनंदी-जगीया मग ते बाल कलाकार असो किंवा शिवराज शेखरची व्यक्तिरेखा लोकांना प्रचंड आवडली. सिद्धार्थ शुक्ला, अविका गौर, अनुप सोनी हे कलाकार या शोमधून हिट झाले आहेत.