मुंबई : 'आशिक बनाया आपने' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने जवळपास 8 वर्षांनंतर लाइमलाइटमध्ये आली आहे. आता तुनश्री दत्ता बिग बॉसमध्ये एक स्पर्धक म्हणून दिसणार आहे. मिस इंडिया युनिवर्स राहिलेली तनुश्री दत्ता आपल्या बहिणीसोबत इशिता दत्तासोबत दिसणार आहे. यावेळी 'बिग बॉस'मध्ये स्पर्धक जोड्यांच्या स्वरूपात भाग घेणार आहेत.
तनुश्री दत्ताने जरी कमी सिनेमांमध्ये दिसली असली तरीही ती वादात भरपूर अडकलेली आहे. ज्याचा परिणाम तिच्या करिअरवर पाहायला मिळाला. तिथेच तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचे आरोप लावले आहेत. आपल्याला माहित आहे, नाना पाटेकर यांची इमेज इंडस्ट्रीमध्ये चांगली आहे. आपल्याला माहित आहे अशावेळी त्यांच्यावर छेडछाडीचा आरोप लावण्यात आला आहे. 'हॉर्न ओके प्लीज' या आयटम साँगच्यावेळी तनुश्रीने हे आरोप लावले आहेत.
तनुश्रीने सांगितलं की, गाण्याच्या शुटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केलं. अचानक नाना पाटेकर यांनी तनुश्रीला मिठी मारली आणि तिला डान्स स्टेप शिकवायले लागले. नाना हे अचानक इतके जवळ आल्यामुळे तनुश्री घाबरली आणि वॅनिटी वॅनमध्ये निघून गेली. तनुश्रीची आई त्यावेळी उपस्थित होती त्यांनी तेथे खूप मोठा गोंधळ निर्माण केला. मात्र नाना पाटेकर यांना कोणताच फरक पडला नाही ते तेथून निघून गेले. तनुश्री यांनी याबाबत काहीच सांगितलं नाही सरळ नाना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.