मुंबई : यंदाच्या वर्षी ईदच्या निमित्तानं अभिनेता सलमान खानची बहिणी अर्पिता खान शर्मा हिच्या घरी खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सलमानच्या वतीनं अर्पिता आणि तिचा पती, आयुष शर्मा यांनी ही पार्टी आयोजित केली होती. यावेळी बऱ्याच सेलिब्रिटींनी पार्टीला हजेरी लावली. (Bollywood Salman khan eid party)
खान कुटुंबाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी दीपिका, रणवीर, सिद्धार्थ मल्होत्रा हे सर्वच सेलिब्रिटी हजर राहिले. पार्टीच्या वेळी खुद्द सलमान पाहुण्यांची काळजी घेताना दिसला.
पार्टीसाठी त्यांना आत आणण्यापासून पार्टीनंतर बाहेर सोडण्यापर्यंतही त्यानं जबाबदारी घेतली. यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण, सलमानची घरवाली आणि बाहरवाली अशा दोघीजणीही पार्टीला आल्या होत्या.
आता तुम्ही म्हणाल हे काय नवं प्रकरण? तर, 'बिवी नंबर 1' या चित्रपटामध्ये सलमाननं अभिनेत्री करिष्मा कपूर आणि सुष्मिता सेन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. चित्रपटामध्ये करिष्मानं सलमानच्या पत्नीची, तर सुष्मिता सेन हिनं त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. (Karishma kapoor sushmita sen)
प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट कमाल गाजला होता. आजही त्याची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. याच दोन्ही अभिनेत्री त्याच्या ईद पार्टीलाही आल्या. तेव्हा तिथं एकच चर्चा झाली.
सुष्मितानं पार्टीसाठी येताना तिथं असणाऱ्या छायाचित्रकारांसाठीही मिठाई आणली. तुम्हा सर्वांसाठी मिठाई... ईद मुबारक... असं म्हणत तिनं तिथं असणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींनाही ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सुष्मिताच्या या कृतीनं सर्वांचीच मनं जिंकली. सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडीो व्हायरल झाला आणि चाहत्यांनीसुद्धा सुष्मिताला दाद दिली.