सुशांतच्या मृत्यूचं कारण अखेर उघड, पाहा काय म्हणतो नवा रिपोर्ट

वाचा सविस्तर वृत्त... 

Updated: Sep 24, 2020, 11:52 AM IST
सुशांतच्या मृत्यूचं कारण अखेर उघड, पाहा काय म्हणतो नवा रिपोर्ट title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोणत्याही गॉडफादरचा वरदहस्त असल्याशिवाय अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant singh rajput यानं कलाविश्वात आपला ठसा उमटवला. फार कमी कालावधीतच प्रसिद्धीझोतात येत त्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. पण, करिअरमध्ये असं एक वळण आलं, की सुशांतनं त्याच्या आयुष्याचाच प्रवास संपवण्याचा निर्णय़ घेतला. त्याचा गळफास लावलेला मृतदेह अनेक प्रश्नांना वाचा फो़डून गेलं. 

काही महिन्यांपूर्वीच सुशांतनं मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. पण, ही हत्या असल्याचा सूरही अनेकांनीच आळवला. अखेर सुशांतच्या मृत्यूचं गुढ बऱ्याच अंशी उकलल्याचं स्पष्ट होत आहे. सीएफएसएल म्हणजेच सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानुसार सुशांतच्या मृत्यूप्रकरणी हत्येचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेचा प्रसंग तपासाच्या अनुशंगानं पुनरुज्जीवित करण्यात आला. पण, यातही सुशांतनं आत्महत्या केल्याचंच उघड झाल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये त्यानं गळफास लावल्याचं निष्पन्न होत आहे. CFSL नं हा अहवाल सीबीआयकडे पाठवला आहे. ज्यावर आता सीबीआयचा अधिकृत दुजोरा प्रतिक्षेत आहे. 

 

सुशांतच्या मृत्यूचं कारण  partial suicide असल्याचाच दावा या अहवालातून करण्यात आला आहे. ज्यामध्ये मृत व्यक्तीचे पाय फाशीच्या वेळी पूर्णपणे हवेत नव्हते. त्याचे पाय बेड अथवा जमिनीला टेकले होते. क्राईम सीन रिक्रिएशन आणि आत्महत्येसाठी वापरण्यात आलेल्या कापडाची पडताळणी केल्यानंतरच हा अहवाल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. हातांचा सरळ वापर करणारी व्यक्तीच असं करु शकते असा निष्कर्ष काढत खुद्द सुशांतचनंच फास लावून घेतल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. थोडक्यात या अहवालाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आल्यामुळं सुशांतच्या आत्महत्या प्रकरणीच्या तपासावरही लवकरच पडदा पडण्याची चिन्हं आहेत.