मुंबई : अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा ही तिच्या फिटनेससाठीच नव्हे तर तिच्या अनोख्या जीवनशैलीसाठीही ओळखली जाते. वयाचा वाढता आकडा मलायकाला स्पर्शही करत नाही, असंच अनेकदा वाटतं. शरीराचा बांधा सुडौल ठेवण्यासाठी योगासनांपासून ते व्यायाम आणि आहाराच्या सवयींना मलायका कायमच प्राधान्य देताना दिसते. या साऱ्यांमध्ये 'चार चाँद' लावून जातो तो म्हणजे तिचा ड्रेसिंग सेन्स.
मलायकाच्या ड्रेसिंग सेन्सची प्रचिती नुकतीच आल्याचं पाहायला मिळालं. जिथं तिनं अशा आऊटफिटला पसंती दिली ज्यामधून तिचा कमनीय बांधा अधिक उठावदार दिसला आणि ड्रेसच्या रंगसंतीनं तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं.
मुंबईत नुकताच लीवा मिस दिवा 2021 चा ग्रँड फिनाले पार पडला. ज्यासाठी अभिनेत्री कृती सेनन, अंगद बेदी आणि मागील वर्षीच्या लीवा मिस दिवाची विजेती अॅडलीन कॅस्टेलिनो हिची उपस्थिती पाहायला मिळाली होती. सेलिब्रिटींच्या या रांगेत मलायकाचाही समावेश होता. जिनं रेड कार्पेटवर सर्वांच्याच काळजाला हात घातला.
फ्लोरलेंथ स्लिट गाऊनला मलायकानं या कार्यक्रमासाठी पसंती दिली होती. गाऊनला असणाऱ्या स्लिटमुळं तिचे पाय यातून सुरेख दिसत होते. तिथं आलेल्या अनेक सौंदर्यवतींना मलायकाच्या अदा पाहून तिचा हेवा वाटला असणार यात शंका नाही.