चार वर्षांपूर्वी पडद्याआड गेली 'चांदनी', हे होत का मृत्यूचं खरं कारण?

तो एक काळा दिवस आला आणि श्रीदेवी यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.  

Updated: Feb 24, 2022, 11:49 AM IST
चार वर्षांपूर्वी पडद्याआड गेली 'चांदनी', हे होत का मृत्यूचं खरं कारण?  title=

मुंबई : 'प्यार हवा का एक झोका है, जो सब कुछ उडा कर ले जाता हैं...' दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या 'चांदनी' सिनेमातील हा डायलॉग... तो एक काळा दिवस आला आणि श्रीदेवी यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमी कानावर येताचं चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला. आज त्या आपल्यात नाही, पण त्यांनी बॉलिवूडला दिलेले हीट सिनेमे आज ही विसरता येणार नाही. 

दुबईत श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या मृत्यूचं रहस्य अद्यापही समोर आलेलं नाही. श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला असल्याचं सांगितलं जातं. श्रीदेवी बाथटबमध्ये पडल्या आणि त्या पडल्या तर त्यांचं निधन झालं कसं? असे अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आले. 

 अनिभिषिक्त श्रीदेवी!

काही दिवसांपूर्वी सत्यार्थ नायक लिखीत 'श्रीदेवी- द एटर्नल गॉडेस'च्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकला. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, श्रीदेवी यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास होता. 

लो बीपी असल्यामुळे त्या बेशुद्ध होत असत. ही गोष्ट त्यांच्या जवळच्या व्यक्तींने सांगितली आहे. अशात म्हटलं जात आहे की, त्यांचा बीपी लो झाल्यामुळे त्या बाथटबमध्ये बेशुद्ध होवून पडल्या. 

बाथटबमध्ये त्या पडल्या असल्या तरी त्यांचा मृत्यू झाला कसा? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. याप्रकरणी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांची चौकशी देखील झाली. पण हाती काही लागलं नाही... 

श्रीदेवी यांनी अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळं वर्चस्व प्रस्थापीत केलं. आजही त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत.