मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारच्या मसाल्यांचा तडका आहे. अफेअर, ब्रेकअप, प्रेम आणि द्वेषही. अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा तर सातत्याने होतच असतात. पण असेही काही कलाकार आहेत ज्यांच्यात ३६ चा आकडा आहे. जाणून घेऊया या हेट बर्ड्सबद्दल...
# यात पहिली जोडी आहे ती म्हणजे सनी लियोनी आणि राखी सावंत. या दोघींचे वाद, भांडण तर जगजाहिर आहेत. सनीच्या बॉलिवूड पर्दापणामुळे राखीचे महत्त्व, भाव कमी झाला. त्यामुळे राखी अनेकदा मीडियासमोर सनीबद्दल वाटेल ते बोलताना दिसते. सनी मात्र राखीच्या या बोलण्याला तिच्या खास शैलीत उत्तर देते.
# दीपिका आणि कतरिनामध्ये असलेल्या वादाचे कारण ठरला रणबीर कपूर. रणबीर-दीपिकाचे ब्रेकअप कतरिनामुळे झाल्याच्या चर्चा होत्या. कदाचित कतरिना ब्रेकअपला जबाबदार ठरल्यामुळे दीपिका काहीशी नाराज असावी. त्यामुळे या दोघीही एकमेकींपासून दूर राहणेच पसंत करतात.
# बॉलिवूडमधील सर्वात जूने भांडण म्हणजे रेखा आणि जयाचे. या दोघींमधील वादालाही महानायक अमिताभ बच्चन कारणीभूत ठरले. त्यामुळे अजूनही त्या एकमेकींपासून लांब राहणेच पसंत करतात. पण काळानुसार राग थोडा निवळलेला दिसतो. म्हणून आजकाल पुरस्कार सोहळ्यात दोघी एकमेकींना सामोरे जातात.
# करिना कपूर खान आणि प्रियंका चोप्रा ही अजून एक हेट जोडी. ऐतराज सिनेमात दोघींनी एकत्र काम केले. यात करिना प्रमुख भूमिकेत होती तर प्रियंका खलनायिकेच्या भूमिकेत होती. पण या प्रियंकाच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यामुळे काहीसा मत्सर निर्माण झाला आणि दोघींनी पुन्हा एकत्र काम केले नाही.