Suhani Bhatnagar Incomplete Wish : अभिनेता आमिर खानच्या 'दंगल' मध्ये छोट्या बबीताच्या भूमिकेत दिसलेली बालकलाकार सुहानी भटनागरचं शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी निधन झाले. सुहानीनं वयाच्या 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुहानीच्या निधनाचे कारण डर्मेटोमायोसिटिस असल्याचे समोर आले आणि स्टेरॉयड्सच्या वापरामुळे मेडिकल कॉम्प्लीकेशन्सचा सामना करावा लागला. एका जुन्या मुलाखतीत सुहानीनं दंगलनंतर कोणताही चित्रपट साइन न करण्यावर वक्तव्य केलं आहे. त्यात तिनं म्हटलं होतं की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती लीड रोल साकारण्याची इच्छा आहे.
जवळपास दोन वर्षांपूर्वी 'टीवी इंडिया लाइव' सोबत दिलेल्या एका मुलाखतीत सुहानी भटनागरला विचारण्यात आलं की दंगलला इतकं यश मिळाल्यानंतर देखील कोणते चित्रपट साइन का नाही केले? यावर सुहानीनं उत्तर दिलं होतं की चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर , फॅशन शो आणि कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्याशिवाय तिला आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे असं तिनं सांगितलं होतं. त्यासाठी ती कोणत्याही प्रोजेक्ट्सकडे लक्ष देत नाही.
सुहानी विषयी बोलायचे झाले तर तिनं बेसिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुख्य भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे. मला मुख्य भूमिका साकारायची आहे. तिनं हे देखील सांगितलं होतं की जर शिक्षण करत असताना कोणत्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली, तर ती नक्कीच त्याविषयी विचार करेल. मात्र, सध्या लक्ष हे शिक्षण पूर्ण करण्यावर आहे. मात्र, सुहानीची ही अखेरची इच्छा पूर्ण झाली नाही. तिनं वयाच्या 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
आमिर खानच्या प्रोडक्शननं सोशल मीडियावर सुहानीच्या निधनाची बातमी जाहिर केली. त्यावेळी त्यांनी म्हटलं की आम्हाला सुहानीच्या निधनाविषयी ऐकून खूप वाईट वाटलं. तिची आई पूजाजी आणि संपूर्ण कुटुंबाच्या दुखा:त आम्ही शामिल होत आहोत. सुहानी ही एक प्रतिभावान मुलगी होती. तिच्याशिवाय दंगल हा चित्रपट अपूर्ण असती. सुहानी, तू कायम आमच्या हृदयात जिवंत राहशील. तुझ्या आत्म्याला शांती मिळो. तर जायरा वसीमनं देखील तिच्या सह-कलाकार असलेल्या सुहानीच्या निधनावर भावना व्यक्त करत हे खोटं असतं तर बरं झालं असतं असं म्हटलं आहे.