मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसत आहे. जिने गंगूबाईची भूमिका साकारली आहे.
एकीकडे लोक आलियाच्या अभिनयाचे कौतुक करताना थकत नाहीत, तर दुसरीकडे काही लोक म्हणतात की आलियाचे वय चित्रपटातील भूमिकेनुसार फार कमी आहे, त्याऐवजी दिग्दर्शकाने दीपिका पदुकोण, विद्या बालन किंवा प्रियांका चोप्रासारख्या अभिनेत्रींची निवड करायला हवी होती असं बोललं जात आहे .
संजय लीला भन्साळी यांनी दीपिका आणि आलिया या दोघींसोबत काम केले आहे, पण जेव्हा दिग्दर्शकाला दोघांमधून एकाची निवड करण्यास सांगण्यात आले तेव्हा संजय लीला भन्साळी यांनी धक्कादायक उत्तर दिले.
एका मुलाखतीत दिग्दर्शक भन्साळी म्हणाले, 'दोघीही वेगळ्या व्यक्ती आहेत, दोघांचा दृष्टिकोन वेगळा आहे, दोघांची उंची वेगळी आहे. दोघांचा आवाज वेगळा, देहबोली देखील वेगळी आहे. दीपिका एक सुंदर मुलगी आणि एक अद्भुत अभिनेत्री आहे. माझ्यासाठी आलिया एक सुंदर मुलगी आणि एक अद्भुत अभिनेत्री आहे.
पण जर मला बाजीराव मस्तानी बनवायची असेल तर मी दीपिकाची निवड करेन आणि जर मी गंगूबाई बनवत आहे, तर मी आलियाची निवड करेन. प्रत्येकाची स्वतःची ताकद असते, तुम्ही चुकीच्या अभिनेत्याला चुकीची भूमिका देऊ शकत नाही.
संजय लीला भन्साळी पुढे म्हणाले, "आलिया आणि दीपिकासाठी निवडलेल्या सर्व भूमिका 'योग्य कास्टिंग'वर आधारित होत्या. असं नाही की आलिया मस्तानी करू शकत नाही किंवा दीपिका गंगू साकारु शकत नाही.
पण त्यांचं व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन मी केलेले कास्टिंग योग्य आहे असे मला वाटते. त्यामुळे या भूमिकेसाठी आलियाने जे केले ते फक्त आलियाच करू शकते आणि दीपिका त्या भूमिकांमध्ये जे करू शकते ते फक्त दीपिकाच करू शकते.
त्यामुळे त्यांनी आलिया आणि दीपिका यांच्यात कोण चांगलं, कोण सर्वश्रेष्ठ अशी तुलना केली नाही