मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळी अभिनेत्री पठाण या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरनंतर अभिनेत्री तिचा ग्लॅमरस लूक फ्लॅान्ट करताना दिसली आहे. तिने तिच्या बोल्डनेसने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
रिअल लाईफमध्येही दीपिकाने आपल्या हॉटनेसने अनेकांना घायाळ केलं आहे. पण चाहत्यांना घायाळ करणारी ही अभिनेत्री अनेकदा ऊप्स मोमेंटची शिकारही झाली आहे. जेव्हा 2017 मध्ये दिपीका तिच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती तेव्हा तिला हा ड्रेस घालण भारी पडलं होतं
दीपिकाचा ऊप्स मोमेंट
2017 मध्ये, दीपिका पदुकोणने एक हॉलिवूड चित्रपट केला आणि या चित्रपटाचं नाव होतं xXx: Return of Xander Cage. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिकाने बोल्ड ड्रेस परिधान केला होता. याचा परिणाम असा झाला की त्याला पुन्हा पुन्हा तो ड्रेस सांभाळावा लागला. xXx: Return of Xander Cage या चित्रपटात दीपिकाने अप्रतिम अभिनय केला आहे. भारतात चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिकाने गोल्डन गाऊन घातला होता. जो बॅकलेस होता आणि समोरून खूप डिपनेक होता.
फोटो व्हायरल
दीपिका या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मात्र तिला हा ड्रेस परिधान करणं भारी पडलं. यानंतर अभिनेत्रीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि दीपिकाचा सर्वात बोल्ड ड्रेस होता.
दीपिकाचं वर्कफ्रंट
दीपीकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री शेवट ब्रम्हास्त्र सिनेमात झळकली होती. यानंतर ती अनन्या पांडेसोबत 'गहराइया'मध्ये दिसली होती. प्रभाससोबतच्या तिच्या पुढच्या चित्रपटाचे नाव आहे - 'प्रोजेक्ट के', ज्यामध्ये अमिताभ बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. ती शाहरुख खानसोबत सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' आणि हृतिक रोशनसोबत 'फाइटर'मध्येही झळकणार आहे.