'देवो के देव महादेव' फेम पार्वतीचा रिवीलिंग लूक, फोटो पाहून म्हणाल, 'उफ्फ...'

अभिनेत्रीचा रिवीलिंग लूक पाहून चाहते आश्चर्यचकित, पाहा फोटो  

Updated: Jan 24, 2022, 11:19 AM IST
'देवो के देव महादेव' फेम पार्वतीचा रिवीलिंग लूक, फोटो पाहून म्हणाल, 'उफ्फ...' title=

मुंबई : 'देवों के देव महादेव' मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून पूजा बॅनर्जी खूप चर्चेत आली होती. पूजा बऱ्याच दिवसांपासून झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. पूजाने असा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी  आहे, त्यामुळे तिचा रिवीलिंग लूक तुफान व्हायरल होत आहे. 

मालिकेत साधी सरव दिसणारी पूजा खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. सध्या व्हायरल होत असलेला तिचा लूक पाहून चाहते देखील हैराण झाले आहे. ही खरंच  'देवों के देव महादेव' या मालिकेत पार्वती आहे का? असा प्रश्न चाहत्यांना उपस्थित होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Puja Banerjee (@banerjeepuja)

पूजा काम तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांना पूजाचे फोटो खूप आवडतात. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. फोटो शेअर करत पूजाने कॅप्शनमध्ये 'गोवा व्लॉग पार्ट 3.. माझ्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह आहे. तुमच्या प्रेमाची आणि साथाची गरज आहे. असं लिहिलं आहे. 

तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, पूजाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'कहानी हमारी महाभारत की', 'कहानी घर घर की', 'करम अपना-अपना', 'सपना बाबुल का..बिदाई', 'तुझ संग प्रीत लगाई सजना', 'किस देस में निकला होगा चांद', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कस्तूरी' या मालिकांमध्ये ती झळकली.