मुंबई : दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना गेल्या महिन्यात रूग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यांना पुन्हा एकदा निमोनिया झाला आहे. ज्याच्यावर आता उपचार घेत आहेत. आता अशी माहिती मिळत आहे की, दिलीप कुमार यांना शुक्रवारी घरी ताप आला आणि याचा त्रास त्यांना फुफ्फुसांना झाला.
दिलीप कुमार यांना पुन्हा तो आजार झाला होता ज्यामुळे ते सप्टेंबर महिन्यात लीलावती हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आली आहे. दिलीप कुमार आता आपल्या घरी आहेत आणि त्यांना अन्न नळीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. डॉक्टर्सचं असं म्हणणं आहे की, आता त्यांना तोंडाद्वारे अन्न आणि पाणी देखील देऊ शकत नाही.
तोंडात गारवा राहावा म्हणून डॉक्टरांनी त्यांना तोंडात बर्फ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. निमोनियावर उपचार करण्यात आले असून फुफ्फुसांवर एक पॅच लावण्यात आला आहे. दिलीप कुमार यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरी दोन प्रशिक्षित नर्स ठेवण्यात आल्या आहेत. या नर्स खूप दिवसांपासून त्यांची सेवा करत आहेत.