टायगरने साथ सोडल्यानंतर दिशानं धरला 'या' पुरुषाचा हात? दोघांचा खासगी Video पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

दिशा पटानीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Nov 7, 2022, 12:52 PM IST
टायगरने साथ सोडल्यानंतर दिशानं धरला 'या' पुरुषाचा हात? दोघांचा खासगी Video पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दिशा चाहत्यांच्या संपर्कात राहते. दिशा गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. त्यानंतर आता दिशा तिचा मित्र अॅलेक्झॅन्डर अॅलेक्ससोबत (Aleksandar Alex Ilic) दिसली. त्या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. 

हेही वाचा रितेश का म्हणतोय 'बायकांना डोक्यावर बसवालं तर...' नक्की काय बिनसलंय ?

खरंतर, दिशा अॅलेक्झॅन्डर अॅलेक्ससोबत मुंबईत दिसली होती. ते दोघे एका हॉटेलमधून बााहेर येत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान तो दिशाविषयी प्रोटेक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर दिशाचा एक चाहता तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना अॅलेक्झॅन्डरनं तिला त्या चाहत्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केला. अॅलेक्झॅन्डरनं दिशाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला पुढे जाण्यास सांगितले. 

दिशा आणि अॅलेक्झॅन्डरचा हा व्हिडीओ पाहा 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशा गाडीत बसेपर्यंत अॅलेक्झॅन्डरनं तिला एकटं सोडलं नाही. कोणीही तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तो बॉडीगार्डसारखं काम करत होता. दिशा आणि अॅलेक्झॅन्डरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी व्हिडीओवर अनेक कमेंट केल्या आहेत. दिशा आणि अॅलेक्झॅन्डरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. 

दिशा आणि अॅलेक्झॅन्डरच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, दिशा टायगर अभी जिंदा है। दुसरा नेटकरी म्हणाला, तिचं आयुष्य आता प्रायव्हेट राहिलेलं नाही. तिसरा नेटकरी म्हणाला, आता नवीन बकरा मिळाला. आणखी एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, जेव्हा ती टायगरसोबत रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा हा तिचा बेस्टफ्रेंड होता आणि त्यानं या दोघांचा ब्रेकअप केला. 

अलेक्झांडर अॅलेक्स हा दिशा पटानीचा जिम ट्रेनर (Disha Patani Gym Trainer) आहे. 'गिरगिट' या वेबसीरिजमधून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याला हिंदी येत नव्हती तर त्यानं या वेबसीरिजसाठी ती भाषाही शिकली. दिशा नेहमीच अॅलेक्झॅन्डरसोबत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.