व्हिडिओ : ‘डिजे काळूराम’ गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ

गेल्या काही महिन्यांपासून लोकगीतांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सुमित म्युझिक वेगवेगळी धमाल गाणी श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे.

Updated: Nov 4, 2017, 03:46 PM IST
व्हिडिओ : ‘डिजे काळूराम’ गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ title=

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून लोकगीतांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सुमित म्युझिक वेगवेगळी धमाल गाणी श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे.

आता पुन्हा एक नवीन गाणं सुमित म्युझिकने आणलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियात आणि यूट्यूबवर चांगलंच गाजत आहे. ‘डिजे काळूराम’ असे या गाण्याचे बोल आहेत. 

‘शांताबाई’, ‘बाबूराव’, ‘शालू’ या सुपरहिट गाण्यांनंतर आता ‘डिजे काळूराम’चा बोलबाला ऎकायला मिळत आहे. सगळीकडे हे गाणं वाजवलं जात आहे. या गाण्याला सचिन, शैलेश आणि संदीप यांनी संगीत दिलं असून त्यांनी हे गाणं लिहिलं आहे. तर हे गाणं सचिन येवलेने गायलं आहे.