Pushpa Pushpa Song: अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandana) बहुचर्चित पुष्पा-2 (Pushpa-2) चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. Pushpa-2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदी भाषेतील गाण्याला गायक मीका सिंहने (Mika Singh) आवाज दिला आहे. पुष्पराजचं स्वागत करण्यासाठी निर्मात्यांनी हे गाणं तब्बल 6 भाषांमध्ये प्रदर्शित केलंय.
'पुष्पा पुष्पा' हे गाणे पुष्पाच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. 'पुष्पाइज्म'ची क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळत असून नवीन गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. पुष्पा-2 चित्रपटातील पुष्पा-पुष्पा गाणं लोकांच्या पसंतीस पडतंय. Pushpa-2 चित्रटपटात पुन्हा एकाद अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 'पुष्पा: द राइज'च्या संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांनी पुन्हा एकदा लोकांना वेड लावणारं गाणं तयार केलं आहे.
'पुष्पा पुष्पा' हे गाणं हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये प्रदर्शित झालंय.. देवी श्री प्रसाद यांनी यासाठी मिका सिंग, नकाश अझीझ, दीपक ब्लू, विजय प्रकाश, रणजीत गोविंद आणि तिमिर बिस्वास या लोकप्रिय गायकांचा आवाज वापरला आहे. 'पुष्पा 2: द रुल'चं संगीत टी-सीरीजने रिलीज केलं आहे.
पुष्पा-2 कधी प्रदर्शित होणार?
'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 ला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे तर मेश्री मूव्ही मेकर्सने निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल या कलाकारांचा समावेश आहे.
प्रदर्शित होण्याआधीच कोट्यवधींची कमाई
चित्रपट प्रदर्शनाआधीच पुष्पा-2 चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे. 500 कोटींचा बजेट असणाऱ्या चित्रपटानं 1200 कोटींची कमाई केली आहे. दक्षिण भारतात डिस्ट्रीब्यूशनसाठी 270 कोटी रुपयांचे थिएटर राइट्स विकले आहेत. तर परदेशात 100 कोटी पेक्षा जास्तची डील झाली आहे. याचा अर्थ चित्रपटानं प्रदर्शित होण्याच्या आधीच 570 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय OTT वर प्रदर्शनासाठी कथितपणे नेटफ्लिक्सनं या 'पुष्पा 2' च्या स्ट्रीमिंगचे राइट्स 275 कोटींमध्ये खरेदी केले आहेत. हा आतापर्यंतच्या कोणत्याही दाक्षिणात्य चित्रपटाच्या इतिहासातील सगळ्यात जास्त मानधन आहे.