कोविडमुळे ईशा गुप्ताची अवस्था झाली अशी, म्हणाली, हे भयंकर त्रासदायक... 

 बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता हिला ९ जानेवारीला कोरोनाची लागण झालीआहे

Updated: Jan 19, 2022, 02:16 PM IST
कोविडमुळे ईशा गुप्ताची अवस्था झाली अशी, म्हणाली, हे भयंकर त्रासदायक...  title=

मुंबई : बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता हिला ९ जानेवारीला कोरोनाची लागण झाली आहे. तेव्हापासून ही अभिनेत्री सतत तिच्या तब्येतीविषयी कोणत्या ना कोणत्या प्रकारे चाहत्यांना माहिती देत ​​आहे. दरम्यान, ईशा गुप्ताने सोशल मीडियावर पोस्ट करत कोरोनामुळे तिची प्रकृती कशी झाली आहे. हे सांगितलय.

कोविड रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची वाट पाहतेय ईशा
ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर अभिनेत्रीने एक कॅप्शन लिहिलंय जे लोकांचे लक्ष वेधून घेतय. या कॅप्शनसोबत अभिनेत्रीने कोरोनामुळे तिची प्रकृती कशी आहे हे सांगितलंय.

ईशा गुप्ता म्हणाली, तड़पाता है कोरोना
ईशा गुप्ताने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची नेहमी वाट पहा. कोरोना फक्त यातना देतो. या कॅप्शनसोबत अभिनेत्रीने एक सॅड इमोजी बनवला आहे.

आतापर्यंत रिपोर्ट नाही आला निगेटिव्ह
ईशा गुप्ताच्या या कॅप्शनवरून हे स्पष्ट झालं आहे की, अभिनेत्री अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची वाट पाहत आहे.

अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंचा बोलबाला
अभिनेत्री सतत तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच ईशाने बेडवरील टॉपलेस लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. ईशाने यापूर्वीही अनेकदा तिचे टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. ज्या फोटोंनी सोशल मीडियावर चर्चा निर्माण केलीये.