‘माझ्या कुत्र्यालाही दोन GF आहेत...’; प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नावरुन सावत्र भाऊ आर्य बब्बरकडून खिल्ली

प्रतीक बब्बर याने दुसरं लग्न केलं. त्याचा लग्नाला वडील राज बब्बर आणि सावत्र बहीण-भाऊ यांना बोलवण्यात आलं नव्हतं. अशातच सावत्र भाऊ आर्य बब्बरचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात प्रतीकच्या लग्नाची खिल्ली उडवली आहे.   

नेहा चौधरी | Updated: Feb 19, 2025, 03:10 PM IST
‘माझ्या कुत्र्यालाही दोन GF आहेत...’; प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नावरुन सावत्र भाऊ आर्य बब्बरकडून खिल्ली title=

Arya Babbar on Prateik Wedding: स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने दुसरं लग्न केलंय. पहिलं लग्न फार कमी दिवस टिकल्यानंतर अनेक वर्षांनी प्रतीक बब्बरने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न करुन संसाराला सुरुवात केलीय. प्रतीक बब्बरच्या लग्नाला त्याने वडील राज बब्बर, सावत्र बहीण - भाऊ यांना आमंत्रण न दिल्यामुळे सर्वांचा भुवया उंचावल्या आहेत. प्रतीकची सावत्र बहीण जुही हिने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, आमच्या कुटुंबाला त्याचा पासून दूर ठेवण्यासाठी कोणीतरी त्याला सांगत आहेत. माझी आई म्हणजे त्याची सावत्र आई हिला लग्नाला न बोलवणे समजू शकतं. पण वडील राज बब्बर यांना लग्नाचे आमंत्रण न देणे याबद्दल आम्ही नाराज असल्याचे ती म्हणाली आहे. त्यात आता प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य बब्बर यानेही एक व्हिडीओ शेअर करत प्रतीकच्या लग्नाची खिल्ली उडवली आहे. 

‘माझ्या कुत्र्यालाही दोन GF आहेत...’

प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी 14 फेब्रुवारीला त्याची आई स्मिता पाटील यांच्या वांद्रे इथल्या घरात लग्न केलं. या लग्नाबाबत आर्य बब्बरने आपली प्रतिक्रिया दिलीय. 'प्रतीकने कुटुंबातील कोणालाही लग्नाचे आमंत्रण पाठवले नव्हते. त्याने त्याचे वडील राज बब्बर यांनाही आमंत्रित केले नाही. मी असंही म्हणेल की, कदाचित त्याची कोणीतरी दिशाभूल केली असेल.

यानंतर प्रतीकने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये आर्या कुटुंबातील सर्वांच्या दोन लग्नांवर टीका करताना दिसली. अशा परिस्थितीत, आर्यने त्याच्या पाळीव कुत्र्याबद्दल असा विनोद केला की लोक प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नावर केलेली टिप्पणी म्हणून त्याचाकडे पाहत आहेत. 

व्हिडीओमध्ये आर्या म्हणतोय की, 'माझी आई मला रोज सकाळी फोन करते.' ती म्हणते आता मी काय करू, मला पंजाबी भाषा शिकावी लागेल का? मग मी तिला म्हणालो, एक काम कर, पुन्हा लग्न कर. माझ्या वडिलांनी दोनदा लग्न केले हे मी मान्य करतो. माझ्या बहिणीचे दोनदा लग्न झालंय. माझ्या भावाने दुसरं लग्न केलं. माझ्या कुत्र्यालाही दोन गर्लफ्रेंड आहेत. त्यामुळे मीही दुसरं लग्न करण्याचा विचार करणार नाही. पण घटस्फोटामुळे येणाऱ्या गुंतागुंतींना तोंड देण्यासाठी मी खूप आळशी आहे.

दरम्यान राज बब्बर यांनी दोनदा लग्न केलं होतं. नादिरा आणि स्मिता पाटील यांच्याशी लग्न केलं होतं. स्मितापासून प्रतीक बब्बर आणि नादिरासोबत दोन मुलं आर्य बब्बर आणि जुही बब्बर आहेत.