मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. यंदा ५ ऑगस्टला फ्रेंडशीप डे सेलिब्रेट करण्यात येईल. बॉलिवूडचे अनेक सिनेमेही मैत्रीवर आधारित आहेत. धर्मेंद्र-अमिताभचा शोले ते अर्जुन-रणवीरचा गुंडे यात सगळ्यात आपल्याला मैत्रीची विविध रुपे पाहायला मिळाली.
पण फक्त रुपेरी पडद्यावरच नाहीत तर काही बॉलिवूड सेलिब्रेटीज खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे घट्ट मित्र-मैत्रिणी आहेत. पाहुया मग अशा सिलेब्स फ्रेंड्च्या जोड्या...
करिना-अमृताची मैत्री काही कोणापासून लपलेली नाही. या दोघींची मैत्री बॉलिवूडकरांना चांगलीच ठाऊक आहे.
प्रियंका सध्या हॉलिवूडमध्ये रमली असली तरी जुन्या मित्र-मैत्रिणींशी ती चांगलीच कनेक्टेड आहे. प्रियंका-अर्पिता या फक्त मैत्रिणी नसून बहिणी आहेत आणि याची माहिती संपूर्ण बॉलिवूड आहे.
जॅकलिन आणि सोनम दोघीही बॉलिवूडच्या स्टाईल दिवा आहेत. जॅकलिन नेहमीच सोनमच्या कामाचे लूक्सचे कौतुक करताना दिसते. सोनमच्या लग्नातही जॅकलिनने खूप धम्माल मस्ती केली.