Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सवाची (Ganeshotsav) मोठ्या दणक्यात सुरुवात झाली आणि आता घराघरांमध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत. सेलिब्रिटी मंडळींनीही घरात बाप्पाची स्थापना करत गणरायाची यथासांग पूजा केली आहे. सेलिब्रिटींच्या गणपतीमध्ये चर्चेत असणारं सर्वात लोकप्रिय कुटुंब म्हणजे सलमान खानचं.
सलमानच्या (Salman Khan) घरचा गणेशोत्सव म्हटलं की, तिथं सेलिब्रिटींची उपस्थिती आणि एकच कल्ला पाहायला मिळतो. यंदाच्या वर्षीही असंच चित्र मिळालं. सलमान खानची बहीण, (Arpita Khan Sharma) अर्पिता खान शर्माच्या घरी यंदाच्या वर्षी बाप्पा विराजमान झाले.
यावेळी खान कुटुंबीयांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावलीच. सोबतच भाईजानचे खास मित्र आणि त्यांचे कुटुंबीयही गणरायाच्या दर्शनासाठी आले. यामध्ये विशेष मन जिंकलं ते म्हणजे रितेशच्या दोन्ही मुलांनी.
जिनिलिया आणि रितेश गणपतीच्या (Genelia DSouza Riteish Deshmukh ) दर्शनासाठी आले, त्यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही मुलंही होती. रिआन आणि राहील, या दोघांनीही त्यावेळी नेहमीप्रमाणेच आईवडिलांच्या साथीनं समोर असणाऱ्या सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना हात जोडून अभिवादन केलं.
पाहा : घटस्फोटांच्या बातम्यांदरम्यान चारू असोपा आणि राजीव सेन पुन्हा एकत्र
चेहऱ्यावर स्मितहास्य आणि जोडलेले हात असं रितेशच्या मुलांचं रूप पाहून तिथं असणाऱ्या अनेकांनी आणि अर्थातच हे क्षण समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या दोघांचं कौतुक केलं. लेकरांना असे संस्कार देणाऱ्या रितेश आणि त्याच्या पत्नीचंही अनेकांनीच कौतुक केलं. थोडक्यात काय, तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं रितेशच्या मुलांचाच जलवा अनेकांच्या नजरा वळवून गेला.