मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज् पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी म्हणजेच ‘पांघरूण’ येत्या ३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. चित्रपटात गौरी इंगवले, रोहित फाळके आणि अमोल बावडेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहेत. या सिनेमातील ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली.
हे गाणे सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आणि फक्त दोन दिवसात ह्या गाण्याला तब्बल एक लाख व्हिव्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले असून विजय प्रकाश यांनी स्वरबद्ध केले आहे. हितेश मोडक यांचे संगीत असून झी म्युझिकच्या द्वारे हे गाणं श्रोत्यांच्या भेटीस आले आहे.
'काकस्पर्श' आणि 'नटसम्राट' या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज् आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर 'पांघरूण' हा चित्रपट 3 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ह्या चित्रपटातून गौरी इंगवले ही अभिनेत्री पदार्पण करत आहे. झी स्टुडिओज् आणि महेश मांजरेकर हे समीकरण मराठी प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही.
त्यांचे दिग्दर्शन असलेल्या काकस्पर्श, नटसम्राट अशा दर्जेदार कलाकृती झी ने प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहचवल्या आणि आता पुन्हा एकदा झी स्टुडिओज् आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर 'पांघरूण' ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. ह्या चित्रपटाचा टीजर नुकताच झी स्टुडिओज् च्या सोशल मीडिया अकाउंट्सवर प्रसिद्ध करण्यात आला. टीजर मध्ये 'पुन्हा एकदा विलक्षण प्रेमकहाणी' नमूद केले असल्याने प्रेक्षकांना ‘पांघरूण’ चित्रपटाबद्दल उत्सुकता असेल ह्याच शंका नाही.