यो यो : हनी सिंगच्या गाण्याला 'सॉन्ग ऑफ द इयर' अवॉर्ड

हनी सिंगच्या 'मखना' गाण्याची यूट्यूबवर धूम

Updated: Feb 22, 2019, 01:23 PM IST
यो यो : हनी सिंगच्या गाण्याला 'सॉन्ग ऑफ द इयर' अवॉर्ड title=

मुंबई : बॉलिवूडमधील रॅपचा बाहशाह म्हणून ओळखला जाणारा यो यो हनी सिंग गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या चाहत्यांपासून दूर होता. गेल्या अनेक दिवसांपासून हनी सिंगचं कोणतंही गाणं आलं नव्हतं. तरीही हनी सिंगचा जलवा, त्याच्या चाहत्यांचं प्रेम आजही कमी झालेलं नाही. बराच काळ चाहत्यांपासून दुर असलेल्या हनी सिंगने गेल्या वर्षी कमबॅक केलं. कमबॅकनंतर त्याच्या रिलीज झालेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. अशाच एका हनी सिंगच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या एका गाण्याला 'सॉन्ग ऑफ द इयर'चा अॅवॉर्ड मिळाला आहे. यो योने स्वत: याबाबची माहिती दिली आहे.

गायक-संगीतकार यो यो हनी सिंगने एका संगीत पुरस्कार सोहळ्यात त्याच्या चार्टबस्टर 'दिल चोरी' गाण्यासाठी 'सॉन्ग ऑफ द इयर'चा अॅवॉर्ड पटकावला आहे. २०१८ मध्ये 'दिल चोरी' गाणं रिलीज झालं होतं. २०१८ मध्ये 'दिल चोरी' गाण्यासह 'छोटे छोटे पेग', 'दल चोरी', 'उर्वशी' यांसारख्या चार्टबस्टर गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. यो योने त्याच्या इन्स्टाग्रामवरून आई आणि सासूचा फोटो पोस्ट करत 'दिल चोरी'साठी 'सॉन्ग ऑफ द इयर'चा अॅवॉर्ड मिळाला असून या पुरस्कारामुळे दोघीही खुश असल्याचं पोस्टमध्ये लिहिलं आहे.   

अनेक दिवसांनंतर हनी सिंगचं 'मखना' गाणं रिलीज झालं. यूट्यूबवरून या गाण्याला चाहत्यांची चांगलीच पसंतीही मिळत आहे. 

 

हनी सिंग त्याच्या कामाच्या ठिकाणचे, गाण्याचा सराव करतानाचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.