Saba Azad and Hritik Roshan: सबा आझाद आणि हृतिक रोशन यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सबा आझाद ही हृतिक रोशनपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. 2014 साली हृतिक रोशननं आपल्या पहिल्या बायकोसोबत वेगळा झाला आणि त्यानंतर त्यानं अभिनेत्री कंगना राणावतलाही डेट केले होते. त्यातून त्यांची ही रिलेशनशिप सर्वाधिक वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे तेव्हा कंगना आणि हृतिक यांची तेव्हा चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यानंतर हृतिक रोशन हा सिंगल होता आणि मग त्यानं आता अभिनेत्री सबा आझादला डेट करायला सुरूवात केली आहे. परंतु यावेळीही हृतिकला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात येते आहे. सबा आझाद त्याच्यासमोर अगदी लहान मुलीप्रमाणे वाटते म्हणून त्याला आणि सबा आझादला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. यावेळी ते परदेशात फिरायला गेलेले असून आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. यावेळी त्यांचा नुकताच एक नवा फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद हे परदेशवारीवर आहेत. पहिल्यांदा त्यांचा एकत्र फोटो व्हायरल झाला होता तेव्हा ते दोघं हे लंडनमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. काही दिवसांपुर्वी ते अर्जेटिना येथे स्पॉट झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा होती. आता सबानं सोशल मीडियावर आपला आणि हृतिक रोशनचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात ते दोघंही एकत्र खुप खुश दिसत असून त्यांच्या या फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्स येयला सुरूवात झाली आहे. त्यावर त्यांच्या चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत त्यातून यात एका कमेंटनं मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी हृतिकच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीनं कमेंट केली आहे.
हेही वाचा - 'मला रडू येत होतं, पॅनिक अटॅक यायचे'; रणवीर सिंगच्या ऑनस्क्रीन बहिणीनं सांगितला ऑडिशनचा अनुभव
Que Bueno Buenos Aires असं सबानं यावेळी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. परदेशातील एका महागड्या रेस्टोरंटच्या बाहेर त्या दोघांनी एक सेल्फी शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या या फोटोवर सुझॅन खाननं कमेंट केली आहे ज्यात ती म्हणाली आहे की, 'खूप सुंदर फोटो'.
यावर मात्र नेटकऱ्यांनी सुझॅनला ट्रोल केलं आहे. 'इतका चांगुलपणा दाखवायची गरज नाही.', 'आता तु नवं रिल करणार ना?', 'इतकी जेलेसी का?' अशी चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी हृतिक आणि सबाच्या पोस्टनंतर सुझॅननंही आपल्या बॉयफ्रेंड सोबतचे फोटो शेअर केले होते. ज्यावरून तिला तू जळतेस असं म्हटत ट्रोल करण्यात आले होते.