मुंबई : आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत राहणारा कमाल आर खान म्हणजेच केआरके पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नुकतंच त्याचं ट्विटर अकाऊंट ट्विटरकडून बंद करण्यात आलं होतं.
ट्विटरवर केआरकेला फॉलो करणा-यांची संख्या ६ मिलियन इतकी होती. आता केआरकेने ट्विटरवर धमकी दिली आहे की, १५ दिवसांच्या आत माझं ट्विटर अकाऊंट सुरू करा नाही तर मी आत्महत्या करेन’.
केआरकेने एक प्रेस रिलीज जारी केली आहे. त्यात तो म्हणाला आहे की, ट्विटर इंडिया आणि स्टाफ महिमा कौल, विरल जैन आणि तरनजीत सिंह यांना माझी विनंती आहे की, त्यांनी १५ दिवसात माझं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू करावं. नाही तर तो आत्महत्या करेल आणि याची जबाबदारी ट्विटर इंडियाची राहिल. यावर ट्विटरकडून अजून काहीही उत्तर देण्यात आलेलं नाहीये.
#KamaalRKhan aka #KRK requests #Twitter to restore his suspended account within 15 days or else he will commit suicide. Read below pic.twitter.com/xT6wICIsMt
— Atul Mohan (@atulmohanhere) November 1, 2017
दरम्यान, केआरकेचं ऑफिशिअल ट्विटर हॅंडल गेल्या महिन्यात बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने सगळा संताप बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्यावर काढला होता. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याने हा संताप व्यक्त केला होता. त्याने आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ सिनेमाला वाईट म्हटले होते.
केआरकेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, त्याने ट्विटर अकाऊंटसाठी खूप मेहनत घेतली होती. तो पुढे म्हणाला होता की, आमिर खानच्या म्हणण्यावर त्याचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलंय आणि यासाठी त्याला ट्विटरकडून कोणती नोटीसही देण्यात आली नव्हती.