Body Dysmorphic Disorder : एखादी शारीरिक किंवा मानसिक व्याधी अनेकदा प्राथमिक स्तरात असताना लक्षात येत नाही. अभिनेत्री इलियाना डिक्रूजही सध्या अशाच व्याधीला सामोरी जाताना दिसत आहे. तुम्हीही तुमच्या शरीराच्या एखाद्या अवयवावियषयी किंवा एकाहून अधिक अवयवाविषयी चिंतेत असता? या प्रश्नाचं उत्तर 'हो' मध्ये असेल, तर सावध व्हा.
शरीरातील कोणत्याही अवयवांविषयी सातत्यानं वाटणारी चिंता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या तुमच्या जीवनावर परिणाम करू शकते. ही एक प्रकारची मानसिक समस्या असून, याला वैद्यकीय भाषेत बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर (BDD) असं म्हटलं जातं.
ही एक जेनेटीक डिसऑर्डर असून, शरीरयष्टीमध्ये असणारा फरकही एखाद्या व्यक्तीसाठी चिंतेचा विषय ठरु शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मुरुमं असल्यास, नाकाराच आकार मोठा असल्यास किंवा अगदी स्थुलता वाढल्यासही ती व्यक्ती संकोचल्यासारखी वागू लागते. ही याच व्याधीची लक्षणं. ही एक (psychological condition) मानसिक स्थिती असून, यामध्ये व्यक्ती सतत त्याच्या शरीरात काही ना काही उणीवा शोधताना दिसते. अभिनेत्री इलियाना डिक्रूझचंही असंच होत होतं. तिनं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भातील खुलासा केला होता.
(वरील वृत्त उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, याविषयीची माहिती मिळवण्यासाठी मानसोचारतज्ज्ञांशी संवाद साधा.)