मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या बिग बॉस ओटीटीमध्ये दिसत आहे. शमिता पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. यापूर्वी, राज कुंद्राच्या प्रकरणादरम्यान शमिताचा या शोमध्ये सामील होण हा अनेकांसाठी जणू धक्काच होता. सध्या शमिता बिग बॉसच्या घरात प्रतीक सहजपालसोबत झालेल्या भांडणामुळे आणि एका तिने केलेल्या एका खुलासामुळे चर्चेत आहे.
अलीकडेच, शमिताने उघड केले आहे की कोरिओग्राफर निशांत भट्टने तिच्याशी गैरवर्तन केले होते, त्यानंतर तिने कोरिओग्राफरला इशाराही दिला आणि अंतरही बनवले. पण आता बिग बॉसच्या घरात शमिताचा सामना निशांतशी झाला आहे, म्हणून तिला ती गोष्ट पुन्हा आठवली.
10 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये शमिता आणि दिव्या अंथरुणावर झोपून एकमेकांशी बोलत असल्याचे दाखवण्यात आले. अभिनेत्रीने दिव्याला सांगितले की एका शो दरम्यान तिला समजले की निशांतने आपली मर्यादा ओलांडली आहे, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली. त्यानंतर शमिताने निशांतपासून स्वतःला दूर केले आणि बोलणे बंद केले.
शमिता म्हणाली, 'मला त्या घटनेबद्दल सांगायला आवडणार नाही, पण निशांतने एकदा माझ्याबरोबर त्याची मर्यादा ओलांडली जी मला अजिबात आवडली नाही. मी त्याला सांगितले की त्याने चुकीचे वर्तन केले आहे. त्यानंतर आम्ही बोलणे बंद केले.
मला वाटते की मी त्याच्यापासून अंतर बनवून ठेवले पाहिजे कारण मला ती घटना पुन्हा आठवायची नाही. म्हणून जेव्हा मी ते स्टेजवर देखील पाहिले, तेव्हा मी फक्त हे दाखवले की होय मला ते माहित आहे. निशांत इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. दुसरीकडे, शमिता दुसऱ्यांदा बिग बॉसमध्ये दिसली आहे. अभिनेत्री यापूर्वी 2009 मध्ये बिग बॉसमध्ये दिसली होती.