वरुण धवन आणि कियारा अडवाणीची क्यूट केमिस्ट्री; व्हिडिओ व्हायरल

'जुग जुग जिओ' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Updated: May 22, 2022, 11:17 PM IST
वरुण धवन आणि कियारा अडवाणीची क्यूट केमिस्ट्री; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई :  बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय अभिनेते वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या आगामी 'जुग जुग जिओ' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलर लाँन्चवेळी  चित्रपटाचे कलाकार तिथे उपस्थित होते. हा चित्रपट आजवर प्रदर्शित झाला नसला तरी त्याची क्रेझ आतापासूनच लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अनिल कपूर आणि नीतू कपूरही खास स्टाइलमध्ये दिसले. यासोबतच वरुणने यादरम्यान असं काही केलं, जे पाहून सगळेच थक्क झाले.

वास्तविक वरुण धवनने कियारा अडवाणीला उचलून घेतलं. हे पाहिल्यानंतर अनिल कपूरपासून ते करण जोहरपर्यंत सर्वांनाच धक्का बसला. आता वरुणचा कियारासोबतचा एक व्हिडिओही इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरुण कियाराला उचलून घेऊन जाताना दिसत आहेत.  'जुग जुग जिओ' हा फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. जो २४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे, या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर, यात वरुण धवन आणि कियारा अडवाणी एकमेकांसोबत खूप क्यूट दिसत आहेत.

चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजवेळी वरुण धवननेही मनीष पॉलसोबत मस्ती केली होती. जे चाहत्यांना खूप आवडलं. वरुण धवनने ट्रेलर लाँचच्या वेळी कियारा अडवाणीचा ड्रेस देखील संभाळला आणि तिला संरक्षण दिले. कियारासाठी वरुणची ही स्टाईल पाहून तिथे उपस्थित लोकं त्याला बघतच राहिले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कियारा अडवाणी आणि वरुण धवनचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. वरुण आणि कियारा व्यतिरिक्त, अनिल कपूर देखील ट्रेलर लॉन्चच्या वेळी नीतू कपूरसोबत मस्ती करताना दिसला.