मुंबईः नेपोटिझमवर बिनधास्तपणे बोलणारी कंगना राणावत सध्या तिच्या वेगळ्या अंदाजमुळे चर्चेत आहे. सतत सोशल मीडियावर नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वांना क्रिटिसाईझ करणारी कंगणा स्वतःही ट्रोलिंगची शिकार होत असते. कंगना नेहमी नेपोटिझमवर बोलते तर कधी थेट बॉलीवूडच्या ड्रग्ज रॅकेटवर बोलते आणि आपल्या सगळ्याच वादग्रस्त वक्तव्यांवरून लोकांच्या शिव्याही खाते. तरीही ती काही शांत बसत नाही.
नुकताच तिचा द लॉक अप हा रिएलिटी शो भलताच पॉप्यूलर झाला होता. त्यात अनेक सेलिब्रेटींची चर्चा होती. बीग बॉस क्विन राखी सावंतही तिच्या या रिएलिटी शोवर बोलणं थांबवू शकली नाही. कॉन्ट्रोव्हर्सी क्विन कंगना आता तिच्या एका आगळ्या वेगळ्या फिल्मच्या चर्चेत आहे. करन जोहरसारख्या दिग्दर्शकासोबत काम न करत सरळ स्वतःच प्रॉडक्शन हाऊस काढून कंगनाने स्वतःच फ्लिम्स करण्याचा सपाटा लावला आहे. मागच्या वर्षीच तिचा थलायवी हा बायोपिक प्रदर्शित झाला होता जो बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यातून यावर्षी रिलीज झालेला धाकड पाहायाला कोणी प्रेक्षकच फिरकले नाहीत. तरीही कंगनाने जिद्द सोडली नाही आता तिचा नवा सिनेमा रिलिज होतं आहे ज्याची सगळीकडे भलतीच चर्चा आहे.
अभिनेत्री कंगना राणावत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटातून भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीची भुमिका करते आहे. इंदिरा गांधींच्या रूपात तिचा पहिला-वहिला लूक रिलिझ झाला आहे.1:21 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये कंगना राणौत इंदिरा गांधींच्या लुकमध्ये अगदी सेम टू सेम त्यांच्यासारखीच दिसते आहे. त्यांच्यासारखीच हेअर स्टाईल आणि साडी घालून इंदिरा गांधीची हूबेहूब नक्कल तिने केली. भारताच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधींचा रोल कंगना इमर्जन्सी या चित्रपटातून करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही कंगनाचेच आहे. हा आगामी चित्रपट आहे 2023 मध्ये रिलिझ होणार आहे जो 1975 मध्ये उलगडलेल्या आणीबाणीच्या सत्य घटनांवर आधारित आहे. हा चित्रपट इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली घडलेल्या घटनांचे वर्णन करणार आहे.
माजी पंतप्रधानांच्या भूमिकेत अनेक अभिनेत्री आपण पाहिल्या आहेत, पण कंगनासारखी भूमिका कोणीही केली नाही. टीझरमध्ये पाहिल्या पाहिल्याच कंगना ओळखून आली नाही, असे काही नेटकऱ्यांचे म्हणणेही आहे. मणिकर्णिका फिल्म्सचा 'इमर्जन्सी' हा कंगनाचा दुसरा बायोपिक आहे. इमर्जन्सी चित्रपटाची निर्मिती तिच्या प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली झाली आहे.