मुंबई : करीना कपूर सोशल मीडियावर दररोज चर्चेत असते.जेव्हापासून ती सोशल मीडियावर सक्रिय आहे तेव्हापासून ती सतत चाहत्यांशी जोडलेली असते. सोशल मीडियावर ती रोज काही ना काही शेअर करत असते. त्याचबरोबर, ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी ती एमएमएस व्हिडिओ लीकची शिकार झाली होती.
खरं तर, करिना कपूर लग्नाआधी शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याचबरोबर त्यांचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे दोघेंही चर्चेत आले होते. त्याचवेळी, या व्हायरल व्हिडिओमध्ये, करीना कपूर आणि शाहिद कपूर बंद खोलीत त्यांच्या विचित्र क्षणांचा आनंद घेताना दिसत होते! दोघंही एकमेकांच्या मिठीत एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंण्ड करताना दिसले.
मात्र, आता करीना कपूर सैफ अली खानसोबत आपलं आयुष्य आनंदात जगत असून ती आपल्या दोन्ही मुलांसोबत खूप खूश दिसत आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. दुसरीकडे, शाहिद कपूरबद्दल बोलायचं झालं तर, तो पत्नी मीरासोबत आनंदी जीवन जगत आहे. तसंच त्याच्या चित्रपटांमुळे तो चर्चेत असतो. नुकताच त्याचा जर्सी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे