मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. गेल्या वर्षी या जोडप्याचे लग्न झाले. त्यानंतर हे दोघंही चर्चेत आहेत. विकी कतरीनाचं लग्न हे सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का होता. यातून सावरून आता सगळंच पूर्ववत होत असताना पुन्हा एकदा विकी - कतरीनामध्ये सलमान खान आला आहे.
विकी-कतरीनाचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे. त्यामुळे ते दोघंही आणि त्यांचे चाहते पण उत्सुक असणार. पण या उत्साहावर पाणी फिरणार असं दिसतंय.
चक्क सलमान खान व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कतरीनाला घेऊन बाहेर जाणार. त्यामुळे पुन्हा एकदा विकी - कतरीनाच्या आनंदावर सलमान विरझण घालणार आहे.
सध्या कतरीना आणि विकी कामाच्या कमिटमेंटमुळे दोघेही एकत्र वेळ घालवू शकत नाहीत. कधी विकी कौशल शूटिंगच्या दरम्यान मुंबईबाहेर राहतो तर कधी कतरिना कैफ.
फेब्रुवारी महिना सुरू झाला आहेआणि व्हॅलेंटाइन डेही जवळ आला आहे पण आता असे दिसते आहे की विकी आणि कतरिना लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकणार नाहीत.
आजकाल कतरिना कैफ तिच्या नवीन चित्रपट 'टायगर 3' मुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती सलमान खानसोबत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगचे नवीन शेड्यूल लवकरच सुरू होणार आहे.
सध्या 'टायगर 3' च्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग बाकी आहे जे दिल्लीत शूट होणार आहे.
निर्मात्यांना चित्रपटाचे शेवटचे शूटिंग जानेवारीमध्ये करायचे होते परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणामुळे शेड्यूल बिघडले. आता 'टायगर 3'चे निर्माते फेब्रुवारीमध्ये चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल शूट करतील, जे 15 दिवसांचे असेल. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाईन डेच्या वेळी कतरिना कैफ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल.